मुंबई - देशात जीडीपी दर कमी झाल्याने अनेक उद्योग क्षेत्र अडचणीत सापडलेले आहेत. अशा स्थितीत आज मांडल्या जाणाऱ्या केंद्र अर्थसंकल्पामध्ये हा दर वाढेल आणि संपूर्ण उद्योग क्षेत्र, उत्पादन क्षेत्र याला उभारी येईल, अशा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा अपटेक लिमिटेडचे संचालक निनाद करपे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
शिक्षणाच्या क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक कर्जाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक मोठे उद्योजक या क्षेत्रात उतरले असले, तरी विद्यार्थ्यांना कर्ज मिळत नसल्याने या संदर्भात प्रचंड मोठी अडचण येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध होईल यासाठीची अपेक्षा आम्हाला आहे, असे करपे म्हणाले.
देशात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात प्रचंड मोठी अपेक्षा केंद्र सरकारकडून आहे. त्यातून अनेक रोजगार निर्मिती असेल, अथवा विकासाचा प्रश्न असेल तर सुटू शकतो. त्यामुळे सरकारने आजचा अर्थसंकल्प त्यासाठी काही सवलती देऊन त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही करपे यांनी व्यक्त केली.