मुंबई - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. यावरुन माजी खासदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सगळं केंद्र सरकारने दिल्यावर महाराष्ट्र सरकार देणार, तर मग राज्य सरकार हवच कशाला??? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.
-
सगळं केंद्र सरकारने दिल्यावर महाराष्ट्र सरकार देणार तर मग राज्य सरकार हवच कशाला??? विद्यमान मुख्यमंत्र्यानी ह्या अगोदर फक्त BMC ची टक्केवारी बघितली, इतर कारभार माहीत नाही म्हणून सरकार १४,६०० कोटी कर्जमाफीचं नियोजन करणार कसं हेच मुख्यमंत्र्याला माहीत नाही व समजत ही नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">सगळं केंद्र सरकारने दिल्यावर महाराष्ट्र सरकार देणार तर मग राज्य सरकार हवच कशाला??? विद्यमान मुख्यमंत्र्यानी ह्या अगोदर फक्त BMC ची टक्केवारी बघितली, इतर कारभार माहीत नाही म्हणून सरकार १४,६०० कोटी कर्जमाफीचं नियोजन करणार कसं हेच मुख्यमंत्र्याला माहीत नाही व समजत ही नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 17, 2019सगळं केंद्र सरकारने दिल्यावर महाराष्ट्र सरकार देणार तर मग राज्य सरकार हवच कशाला??? विद्यमान मुख्यमंत्र्यानी ह्या अगोदर फक्त BMC ची टक्केवारी बघितली, इतर कारभार माहीत नाही म्हणून सरकार १४,६०० कोटी कर्जमाफीचं नियोजन करणार कसं हेच मुख्यमंत्र्याला माहीत नाही व समजत ही नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 17, 2019
राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या मागणीवरुन निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यानी या अगोदर फक्त मुंबई महापालिकेची टक्केवारी बघितली आहे. इतर कारभार त्यांना माहीत नसल्याचेही राणेंनी म्हटले आहे.