मुंबई - शिवसेना खासदारांची आज मुंबईत बैठक आयोजीत करण्यात आली होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. यावरुन निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. स्थगिती सम्राट मुख्यमंत्र्यांनी स्वत: च्या खासदारांना पण स्थगिती दिल्याचे म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.
मातोश्रीवर शिवसेना खासदारांची आज बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. संसदेचे सुरू असलेलं अधिवेशन, त्यात मांडली जाणारी महत्त्वाची विधेयकं, राज्यातले विविध मुद्दे यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र अचानक ही बैठक रद्द का करण्यात आली याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही.