ETV Bharat / state

नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारे यांना अल्टिमेटम

Nilam Gorhe on Sushma Andhare : आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Nilam Gorhe on Sushma Andhare
नीलम गोऱ्हे आणि सुषमा अंधारे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 10:39 PM IST

मुंबई Nilam Gorhe on Sushma Andhare : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषद सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक त्यांनी एकत्र येत सभागृहाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यास कोणाचं दुमत नसल्याचं एकमत झालं. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना बोलण्याची संधी दिली नसल्याचा आरोप केलाय. यावर भाजपा आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी त्यांच्यावर हक्क भंग आणावा अशी मागणी सभागृहात केली. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यासाठी वेळ दिलाय. जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर हक्क भंग दाखल करण्याची परवानगी प्रवीण दरेकर यांना दिली जाईल, असं विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात सांगितलं.

सभागृहाचा केला अवमान : यावेळी बोलताना भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, नीलम गोऱ्हे ह्या आपल्या सदनाच्या उपसभापती असून रवींद्र धंगेकर हे खालील सभागृहाचे सदस्य असताना आरोप केले आहेत. त्यांना काही आक्षेप असेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्याबाबत आक्षेप नोंदवायला हवा होता. मात्र तसं न करता त्यांनी उपसभापतींवर आरोप केल्याने आपल्या सभागृहाचा अवमान केला आहे. त्यामुळं याची देखील दखल घ्यावी यासाठी आपण हक्क भंग दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, माझ्याकडे देखील कोणीतरी व्हिडिओ पाठवला आहे. त्यामध्ये ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांनी आरोप केला आहे की, मी पक्षपातीपणा करते. खालच्या सभागृहातील सदस्याला मी कशी काय बोलायची परवानगी देणार असा प्रश्न देखील यावेळी नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलाय. विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी मात्र थोडी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

दरेकर यांना हक्क भंग दाखल करण्याची परवानगी : एकच गोष्ट तीन वेळा बोलल्याने ती खरी मानली जाते. त्यामुळं एखाद्या व्यक्तीला चुकीची जाणीव करून दिली पाहिजे. त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. सुषमा अंधारे यांनी आपल्याकडून अज्ञानातून गैरसमजातून झाल्याचं म्हणत आठ दिवसाच्या आत लेखी पत्र देऊन दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा प्रवीण दरेकर यांना त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी, अशाप्रकारे सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मागणी केली आहे. यावर आठ दिवसाच्या आत पत्र आलं नाही तर प्रवीण दरेकर यांना हक्क भंग दाखल करण्याची परवानगी दिली जाईल.

शहानिशा करावी : माध्यमांनी देखील एखाद्या घटनेच्या संदर्भात शहानिशा करणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती एखादा ठिकाणी गेली तर त्याची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात सदरच्या व्यक्तीचे स्पष्टीकरण न घेता ते वृत्त छापल जातं. वृत्तवाहिनीवर व्हिडिओ दाखवतात ते फॉरेन्सिककडून तपासून घ्यावे, हा व्हिडिओ व्हायरल आणि तो दिवसभर दाखवला जातो. या संदर्भात काय वृत्तवाहिनीने दिलगिरी व्यक्त केला आहे. मला कोणत्या वाहिनीवर बंधन आणण्याचा हेतू नसल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. CM Eknath Shinde: नीलम गोऱ्हेंना मातृशोक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सांत्वनपर भेट
  2. Neelam Gorhe : हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नी राज्य सरकार मांडणार ठराव - नीलम गोऱ्हे
  3. Silver Oak Attack : कालचा हल्ला पवार कुटुंबियांना इजा पोहचविण्याचा हेतूने : नीलम गोऱ्हे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.