मुंबई : 18 डिसेंबर 2022 रोजी पश्चिम रेल्वेवर दिवसाचा ब्लॉक नसेल. तर पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक, तर शनिवार 17 डिसेंबर आणि रविवार 18 डिसेंबर 2022 पश्चिम रेल्वेद्वारे ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी ब्लॉक (night block on Western Railway line) आहे.
रात्रीचा ब्लॉक : वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर 23.30 ते 03.30 पर्यंत आणि वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर 01.15 ते 05.15 पर्यंत 4 तासांचा रात्रीचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद गाड्या वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या (night block on Railway line) जातील.
गाड्या रद्द : ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. या ब्लॉकची सविस्तर माहिती स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे. जनतेने त्यांना देखील संपर्क करावा. रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवास सुरू करताना वरील व्यवस्था लक्षात ठेवा. त्यामुळे रविवार, १८ डिसेंबर २०२२ रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवसाचा ब्लॉक असणार (block on Western Railway line) नाही.