मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई येथील विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणातील आरोपींना आठवड्यातून किमान एकदातरी न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. आरोपींमध्ये प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित यांचा समावेश आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी न्यायालयात उपस्थित राहत नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी पुढील सुनावणी 20 मेला होणार आहे.
मालेगावमधील एका मशिदीत २९ सप्टेंबर २००८ ला बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ८ जणांना यूएपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती.