मुंबई : जावेद अख्तर यांनी सप्टेंबर (2021)मध्ये एका मुलाखतीत तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केली होती. या प्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेमध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. जावेद अख्तर यांना (दि. 6 फेब्रुवारी)रोजी मुलुंड कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी केले होते. याच समन्सविरोधात सत्र न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.
प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश : या प्रकरणात न्यायालयाने अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या विरोधात वकील संतोष दुबे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने जावेद अख्तर यांना दिले असल्याने यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये जावेद अख्तर यांनी पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर रहावे असे नमूद करण्यात आले आहे.
अख्तर यांचे शब्द नक्की काय होते? : तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांबद्दल जावेद अख्तर म्हणाले त्यांची वक्तव्ये माझ्या लक्षात नाहीत. मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचे मोजक्या मुस्लिमांनी समर्थन केले आहे. त्यांची वक्तव्ये ऐकून धक्का बसला. आज भारतातील बहुतेक तरुण मुस्लिमांना चांगली नोकरी आणि त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे असे वाटते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे प्रतिगामी विचारांचे समर्थन करीत आहेत. जिथे महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो अशा प्रतिगामी विचारांना ते प्रोत्साहन देत आहेत.
काय आहे प्रकरण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे. असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला असून भाजपने अख्तर यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. तक्रारदार वकील संतोष दुबे यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये गीतकार कवी जावेद अख्तर यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता आयपीसी कलम 499 आणि 500 बदनामीची कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. याच प्रकरणात अक्षर यांच्या विरोधात समन्स जारी करण्यात आले होते.
हेही वाचा : जेट एअरवेजचे संस्थापक गोयल दांपत्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतिम दिलासा