कोविड नियमांचे उल्लघंन: रसना बार सात दिवसांसाठी सील, डी मार्टला ५० हजारांचा दंड - रसना बार 7 दिवसांसाठी सील
कोविड सुरक्षा नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी तुर्भे येथील रसना बार सात दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. तर बेलापूर येथील डी मार्टला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे.

नवी मुंबई : शहरात दिवसेंदिवसस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोविडचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवे आदेश जारी केले आहेत. यामध्ये कोविड नियमांचे उल्लघंन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तरीही न ऐकल्यास मॉल, दुकाने सील करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यानुसार तुर्भे येथील रसना बार सात दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. तर बेलापूर येथील डी मार्टला ५० हजरांचा दंड ठोठावला आहे.
गर्दी झाल्यास आस्थापनांना ५० हजारांचा दंड
डी मार्ट येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियम न पाळल्याने नवी मुंबई मनपाकडून नेमण्यात आलेल्या विशेष पथकाने ५० हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास डीमार्ट सील करण्याचा इशाराही दिला आहे.
रसना बार ७ दिवसांसाठी सील
दोन वेळा कारवाई करूनही रात्री आठ नंतर बार सुरू ठेवल्याने आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने तुर्भे येथील रसना बार अँड रेस्टॉरंटला विशेष पथकाच्या माध्यमातून ७ दिवसांसाठी सील करण्यात आले आहे.
हेही वाचा - पनवेल महापालिकेच्या 15 नगरसेवकांचे निलंबन