ETV Bharat / state

विशेष : इतिहासात प्रथमच सेन्सेक्सच्या लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 3 ट्रिलियन डॉलर्स पार - निफ्टी

इतिहासात प्रथमच बीएसईनंतर एनएसईवर सूचीबद्ध कंपन्यांची मार्केट कॅप 3 ट्रिलियन डॉलर ओलांडली आहे. एनएसईने स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सच्या जबरदस्त वाढीमुळे हे शिखर गाठले.

news about sensex and market cap
सेन्सेक्सच्या लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप
author img

By

Published : May 29, 2021, 6:47 AM IST

Updated : May 29, 2021, 12:15 PM IST

मुंबई - इतिहासात प्रथमच बीएसईनंतर एनएसईवर सूचीबद्ध कंपन्यांची मार्केट कॅप 3 ट्रिलियन डॉलर ओलांडली आहे. एनएसईने स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सच्या जबरदस्त वाढीमुळे हे शिखर गाठले. बीएसई जे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे, त्या बीएसईने हा उच्चांक गेल्या शुक्रवारी (21 मे) गाठला होता.

याबाबत तज्ञांच्या प्रतिक्रिया

विश्लेषकांच्या मते, जानेवारीच्या मध्यापासून निफ्टी आणि सेन्सेक्स चांगला परफॉर्म करत आहे. त्यामुळे मिडकॅप आणि स्मॉल-कॅप सेगमेंटमध्ये लिक्विडिटी वाढत आहे. तसेच बहुतेक लार्ज-कॅप शेअर्सच्या उच्च मूल्यांमुळे गुंतवणूकदारांनी मिड-कॅप आणि स्मॉल-कॅपच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. निफ्टी मिडकॅपच्या 52 आठवड्यांच्या कालावधीत आपल्या निम्न स्तरावरून 97%, निफ्टी स्मॉलकॅप 134% आणि निफ्टी 500 70% वाढले आहेत.

गुंतवणूकदारांच्या 'इन्व्हेस्टमेंट सेंटिमेंट' सुधारल्या -

बुधवारी (26 मे) सेन्सेक्सने स्थानिक शेअर बाजाराची सुमारे तीन महिन्यांत प्रथमच 51,000 ची पातळी ओलांडली. तर निफ्टी विक्रमी उच्चांकापर्यंत पोहोचला. कोविड संसर्गामध्ये दररोज होणारी घसरण आणि लॉकडाऊनवरील निर्बंध कमी होण्याच्या चिन्हे; यामुळे शेअर बाजारात चांगले दिवस दिसत आहेत. याशिवाय मार्च तिमाहीच्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न आणि बर्‍याच कंपन्यांच्या आशावादी निकालामुळे गुंतवणूकदारांच्या 'इन्वेस्टमेंट सेंटिमेंट' सुधारल्या आहेत.

सेन्सेक्स मार्केट कॅपचा प्रवास -

आजपासून सुमारे 7 वर्षांपूर्वी म्हणजेच 28 नोव्हेंबर 2014 रोजी बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 100 लाख कोटींच्या पार गेली होती. मार्च 2002 मध्ये बीएसईच्या सर्व लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 125 बिलियन अब्ज डॉलर्स होती. ऑगस्ट 2005 मध्ये ती वाढून 500 अब्ज डॉलर्स झाली. 28 मे 2007 रोजी ते 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली. 6 जून 2014 रोजी ती 1.5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली. 10 जुलै 2017 रोजी हे 2 ट्रिलियन डॉलर्स, 16 डिसेंबर 2020 रोजी 2.5 ट्रिलियन डॉलर्स आणि 24 मे 2021 रोजी 3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली.

बाजार मूल्य म्हणजे काय?

एखाद्या स्टॉकची बाजार किंमत ही गुंतवणूकदार एखाद्या विशिष्ट वेळी स्टॉक खरेदी करण्यास तयार असतो. व्यवसायाच्या दरम्यान वारंवार बदल होत असतात. त्याचप्रमाणे कंपनीचे एकूण बाजार मूल्य त्याच्या सर्व समभागांच्या एकूण बाजारभावाइतके असते.

हेही वाचा - कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा; इंडियन बँकेकडून १०२ जणांना नोकरी

Last Updated : May 29, 2021, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.