ETV Bharat / state

New MLC Took Oath : नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांनी पदाची घेतली शपथ - Legislative Council Member

पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातील पाच नवनिर्वाचित सदस्यांनी उपसभापतींकडून विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

Legislature
विधानभवन
author img

By

Published : Feb 8, 2023, 7:35 PM IST

मुंबई : विधान परिषद निवडणूकीत शिक्षक पदवीधर मतदारसंघात विजय मिळवलेल्या सदस्यांना विधान परिषद उपसभापती यांच्याकडून आज शपथ देण्यात आली. यावेळी विधान भवन, मुंबई येथे झालेल्या या शपथविधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार तसेच विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडला.

नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ : विधानपरिषदेवर पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्यांपैकी सत्यजीत सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर ) व धीरज रामभाऊ लिंगाडे (अमरावती विभाग पदवीधर) तसेच विधानपरिषदेवर शिक्षक मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्य विक्रम वसंतराव काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक), सुधाकर गोविंदराव अडबाले (नागपूर विभाग शिक्षक) व ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे (कोकण विभाग शिक्षक ) अशा एकूण पाच सदस्यांनी आज 08 फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचेकडून विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.

ठाकरे गटाला निवडणुकीत फटका : महाविकास आघाडी यांच्यावतीने कोकण विभागातील शिक्षक मतदार संघासाठी बळीराम पाटील यांची उमेदवारी दिली गेली होती. मात्र ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे जे उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात सामील झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने विधान परिषदेची शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढवली. ते चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले. त्यामुळे नागपूर या ठिकाणची जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली नाही. यासोबत कोकणामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाच्या मदतीने विजयी मिळवण्यास मदत झाली. यामुळे विधानपरिषद निवडणूकीत ठाकरे गटाला फटका बसला आहे.

भाजपाला नाराजी भोवली : विदर्भातील नागपूर येथील नागो गाणार हे भाजपच्या शिक्षक परिषदेचे नेते आहेत. विधान परिषदेसाठी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत ते सतत निवडून आलेले होते. मात्र यावेळी त्यांना मात्र मतदारांनी साथ दिली नाही. तसेच भारतीय जनता पक्षामधील तरुण असलेले शिक्षक मतदार संघासाठी निवडणुकीत बाशिंग बांधून बसलेले काही नेते देखील होते त्यांना डावलेल्याची भावना देखील त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये पसरली होती. महाविकास आघाडीच्यावतीने मात्र या ठिकाणी उमेदवार देताना आधी त्याबद्दलची तपशीलवार माहिती घेऊन मगच उमेदवार उभा केला त्यामुळे देखील महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले.

नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत : नाशिक पदवीधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेच्या पाठिंब्याने शुभांगी पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली. शुभांगी पाटील यांनी चांगल्या मतांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. मात्र त्यांना सत्यजित तांबे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणूनच उमेदवारी हवी होती, हे त्यांनी बोलून दाखवले होते. मात्र सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी मात्र ए बी फॉर्म भरला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्येच तणाव निर्माण झाला आणि सरते शेवटी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली आणि भाजपचेही त्यांना मते मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : Balasaheb Thorat Resigns : बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर होणार? दिल्लीतून हालचाली सरू...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.