मुंबई - मुंबईतून सुटणाऱ्या सिंहगड, सेवाग्राम आणि मनमाड एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेपेक्षा पाच मिनिटे आधी सुटणार आहेत. या बदलेल्या वेळेचे नवीन वेळापत्रक आजपासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
आजपासून गाडी क्र. १७३२१ हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस ५ ऑक्टोबरपासून तर गाडी क्र. १७३२२ एलटीटी-हुबळी एक्सप्रेस ही गाडी ६ ऑक्टोबरपासून रद्द करण्यात आली आहे. तसेच सीएसएमटी-गदग-सीएसएमटी एक्स्प्रेस (गाडी क्र. १११३९ आणि १११४०) ही गाडी आता दररोज धावणार आहे. लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेसच्या वेळापत्रकामध्येही बदल करण्यात आली आहे. कोल्हापूरवरून सुटणारी कोयना एक्स्प्रेस सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांऐवजी सकाळी ८ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल.
सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस(गाडी क्र. ११०५१/११०५२) या गाडीचे रूपांतर सुपरफास्ट गाडीमध्ये करण्यात आले असून आता ही गाडी (गाडी क्र. २२१३३/२२१३४) या नविन क्रमांकाने धावेल. त्यामुळे या गाडीचे प्रवासी अंतर १ तासाने कमी होईल. कोल्हापूरवरून सुटणारी सोलापूर एक्स्प्रेस या गाडीचा प्रवासी वेळ दोन तासांनी कमी होईल.
मध्य रेल्वेने १० एक्स्प्रेस गाडय़ांचा प्रवास वेळ १० मिनिटे ते ३० मिनिटांपर्यंत तर २९ एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास वेळ ३ मिनिटे ते २० मिनिटांपर्यंत कमी केला आहे. ३० पॅसेंजर गाड्यांचा वेळही सुमारे ३५ मिनिटांपर्यंत कमी केला आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.