ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 1359 नवे रुग्ण, 77 जणांचा मृत्यू - मुंबई महापालिका कोरोना आकडेवारी बातमी

मुंबईत आज नव्याने 1 हजार 359 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 77 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आज 298 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 31 हजार 338 वर पोहचला आहे. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 61 हजार 501 वर पोहचली आहे. त्यापैकी 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनाचे 1359 नवे रुग्ण
मुंबईत कोरोनाचे 1359 नवे रुग्ण
author img

By

Published : Jun 17, 2020, 10:32 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचे नवे 1 हजार 359 रुग्ण आढळून आले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 हजार 501 वर पोहचला आहे, तर मृतांचा आकडा 3 हजार 242 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 31 हजार 338 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 26 हजार 921 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 1 हजार 359 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 77 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 53 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. या मृतांमध्ये 59 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश होता. मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 43 जणांचे वय 60 वर्षावर तर, 27 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 298 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 31 हजार 338 वर पोहचला आहे. तर, मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा एकूण आकडा 61 हजार 501 वर पोहचला आहे. त्यापैकी 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईमधून आतापर्यंत 31 हजार 338 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 26 हजार 921 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत 16 जूनपर्यंत 2 लाख 69 हजार 608 चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत 10 ते 16 जूनपर्यंत रुग्ण वाढीचा दर 2.43 टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर 46 टक्के इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्या असलेल्या 834 विभाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर, 5 हजार 205 इमारतींमध्ये काही मजले तर काही विंग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

ऑक्सिजनची मात्रा योग्य आहे का, यासाठी आतापर्यंत 3 लाख 68 हजार 791 जेष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 991 जेष्ठ नागरिकांना कोरोना केअर सेंटर 1 मध्ये उपाचारासाठी पाठवण्यात आले आहे. गेल्या 24 तासात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या 4 हजार 993 लोकांचा शोध घेण्यात आला आहे. सध्या कोरोना केअर सेंटरमध्ये अति जोखमीचे 20 हजार 365 रुग्ण भरती असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.