मुंबई : लालबाग मधील नारायण उद्योग समोर असलेल्या बॉबी सँडविच हे दुकान चालवणाऱ्या अमजद अली याला उत्तर प्रदेशातून काळाचौकी पोलिसांनी चौकशीसाठी मुंबईत आणले. त्याची देखील कसून चौकशी सुरू आहे. अमजद अली हा 7 जानेवारीला उत्तर प्रदेशात आपल्या मूळ गावी गेला. हत्या झाल्यानंतर तो गावी गेला की काय त्या अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने न्यूरोसर्जन डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरू असून त्यासाठी तो गावी गेला असल्याचे त्याने सांगितले. मानेच्या आणि मेंदूच्या मध्ये असलेला मज्जारज्जूमध्ये त्रास असल्याने त्याला बोलण्यास कधीकधी समस्या येत असल्याचे अमजद अलीने सांगितले. त्यासाठी आमची उत्तर प्रदेशातील न्यूरोसर्जन डॉक्टर रस्तोगी यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी तो 7 जानेवारीला उत्तर प्रदेशला गेला होता. मात्र 7 डिसेंबरला रिंपल जैनची आई पहिल्या मजल्यावरून पडली त्यानंतर तिला खालीच असलेल्या चायनीज हॉटेल मधील दोन वेटरच काम करणाऱ्या मुलांच्या मदतीने रिंगटोन घरी घेऊन गेली. त्यादिवशी अमजद अली याने तिला सांगितले होते. अमजद अलीच्या बॉबी सॅंडविच्या दुकानावर रिंपल आणि तिची आई बऱ्याचदा खरेदी करण्यासाठी यायच्या. त्यातूनच रिंपलची त्याच्याशी ओळख झाली होती.
कोण आहे श्रीनिवास मुळीक? : श्रीनिवास मुळीक याने काळाचौकी पोलिसांनी केलेल्या चौकशी त्याचे रिंपल जैनसोबत ऑक्टोबर 2022 पासून अफेअर असल्याचे सांगितले. श्रीनिवास मुळीक हा दोन महिन्यांपूर्वी लालबाग मधील रिंपल जैनच्या बिल्डींग खाली असलेल्या फ्लेवर्स ऑफ चायनीज या हॉटेलमध्ये कॅश काऊंटरवर काम करायचा. त्यानंतर फ्लेवर्स ऑफ चायनीज या हॉटेलची शाखा असलेल्या माटुंगा येथे हॉटेलवर श्रीनिवास काम करू लागला होता. श्रीनिवास याला रिंपलचे शेजारी रिंपलच्या घरातून घाणेरडा वास येत असल्याचे सांगितले होते. त्यावर श्रीनिवासने रिंपलला याबाबत विचारल्यास रिंपलने सांगितले की, घरातील बाथरूम चॉकअप झाला असल्यामुळे घाणेरडा वास येत आहे. प्लंबर आला की दुरुस्ती करून घेईन अशी बतावणी रिंपलने केली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप तरी श्रीनिवास मुळीक याचा या हत्येशी संबंध नाही.
हे आहेत 17 पुरावे : काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळावरून दोन कापडाचे तुकडे, जुनी शाल, इलेक्ट्रिक ग्राइंडर, टी-शर्ट, जीन्स, कुर्ता सफेद टी-शर्ट, फिनेलच्या पाच बॉटल, रूम फ्रेशनरच्या पाच बॉटल, एक्सटेंशन बोर्ड, स्टील टाकी, गाऊन, सुरी, 1 अँड्रॉइड मोबाईल आणि दोन मोबाईल हँडसेट, सोनसाखळी असे 17 भक्कम पुरावे गोळा केले आहेत. जप्त केलेला मुद्देमालापैकी काही वस्तू या रिंपल जैनने लालबाग मधील दुकानातूनच खरेदी केल्या होत्या. रिंपलने ज्या ज्या दुकानातून खरेदी केली होती त्या त्या दुकानात पोलिसांना घेऊन गेली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मृतदेहांचे तुकडे करण्यासाठी वापरले ग्राइंडर : रिंपल जैन ने 27 डिसेंबरला आईच्या मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा 31 डिसेंबरला तिने तुकडे केले. नंतर नवीन वर्षात दोन जानेवारी आणि चार जानेवारीला विंपलने आईच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने रिंपलने मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी रिंपलने लालबाग मधील हार्डवेअर दुकानातून इलेक्ट्रिक ग्राइंडर चौदाशे रुपयांना विकत घेतले. मात्र ते बंद पडल्यानंतर तिने पुन्हा दोन हजार रुपयांना दुसरे इलेक्ट्रिक ग्राइंडर विकत घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा: Supriya Sule Appeal State Govt: 'सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, ईडी सरकार असंवेदनशील'