ETV Bharat / state

BEST PLANS : बेस्टच ! नव्या योजनांमुळे प्रवासी आणि बेस्ट दोघांना फायदा - बेस्ट

मुंबईकरांची लाईफलाईन (new plans of BEST lifeline of Mumbaikars) असलेल्या बेस्टकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनांचा फायदा बेस्टसह प्रवाशांना होत आहे. कमीतकमी खर्च करून जास्त प्रवास करायला मिळत असल्याने, प्रवासी खुश आहेत. तर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने (benefit both passengers and BEST) बेस्टलाही फायदा होत आहे. BEST PLANS

BEST PLANS
प्रवासी आणि बेस्ट दोघांना फायदा
author img

By

Published : Oct 19, 2022, 7:37 PM IST

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन (new plans of BEST lifeline of Mumbaikars) असलेल्या बेस्ट उपक्रमाकडून आपली प्रवासी संख्या वाढवण्यासाठी नवनवीन योजना आणल्या जात आहेत. बेस्टकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनांचा फायदा बेस्टसह प्रवाशांना होत आहे. कमीतकमी खर्च करून जास्त प्रवास करायला मिळत असल्याने, प्रवासी खुश आहेत. तर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने (benefit both passengers and BEST) बेस्टलाही फायदा होत आहे. BEST PLANS

बेस्टची प्रवासी संख्या वाढली : मुंबईमध्ये बेस्ट उपक्रमाकडून परिवहन सेवा दिली जाते. बेस्ट गेल्या काही वर्षांपासुन आर्थिक अडचणीत आहे. यामुळे बेस्टकडून व खासगी कंत्राटदाराकडून एसी बस चालवल्या जात आहेत. एसी बसेसमुळे प्रवाशांना चांगला प्रवास करायला मिळत आहे. त्यातच बेस्टने डिजिटल सेवा उपलब्ध करून दिली आहे. चलो अँपच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाईलवरून, कार्डवरून तिकीट काढता येत आहे. प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी बेस्टकडून नेहमी नव नव्या योजना जाहीर केल्या जात आहेत. यामुळे बेस्टमधून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३२ लाखांवर गेली आहे.

प्रवाशांनी असा घेतला लाभ : बेस्टच्या चलो अँपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन योजना आणण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक रुपयांत पाच वेळा प्रवास करण्याची योजना आणली होती. दरम्यान २२ जुलै ते ३१ ऑगस्ट या ४१ दिवसात १ लाख ६१ हजार ३७७ प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान ७९९ रूपयां ऐवजी १९९ रुपयांमध्ये २० रूपये टिकीटचा ५० वेळा प्रवास कारण्याची योजना आणली. त्याचा ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत ६३०० प्रवाशांनी लाभ घेतला आहे. नवरात्रोत्सव दसरा निमित्त २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या १० दिवसांच्या कालावधीसाठी १९ रुपयांमध्ये १० वेळा प्रवास करण्याची योजना आणली. त्याचा ७४ हजार ६६४ प्रवाशांनी लाभ घेतला. बेस्टच्या तीन योजनांचा २ लाख ४२ हजार ३४१ प्रवाशांनी लाभ घेतला आहे. दरम्यान बेस्टकडून दिवाळीसाठी १२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी ९ रुपयांमध्ये ५ वेळा प्रवास करण्याची योजना आणली आहे. चलो अँपचा नव्याने वापर करणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढली : बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असल्याने, बेस्टकडून कमीत कमी तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. कमीतकमी ५ किलोमीटरसाठी ५ रुपये, तर एसी साठी ६ रुपये तिकटी दर आहे. त्यानंतर १० रुपये आणि २० रुपये असा तिकीट दर आहे. यामुळे बेस्टमधून स्वस्त आणि चांगला प्रवास करायला मिळत असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. कोरोना दरम्यान बेस्टने १२ लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर प्रवाशांची संख्या २८ लाखांवर गेली आहे. सध्या बेस्टने ३२ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. BEST PLANS

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.