मुंबई : ओमिक्रॉन एक्सबीबी आणि बीक्यु.1 च्या नवीन व्हेरिऐंटमुळे (New Omicron variants) महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आणि हॉस्पिटलायझेशनमध्ये फारशी वाढ झाली नाही. या विषाणूच्या संसर्गामुळे लक्षणे सौम्य असतात, असे तज्ञांनी नमूद (not causing significant rise in corona virus) केले आहे. फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ अनिता मॅथ्यू यांनी सांगितले की, नवीन रुग्णांपैकी अनेकांना लक्षणे दिसत नाहीत. बर्याच जणांना प्राथमिक संसर्ग आहे. असे रुग्ण आरोग्याच्या इतर तक्रारीमुळे हॉस्पिटलला येतात यावेळी ते कोरोनाची चाचणी करुन घेत आहेत.
सावधगिरी बाळगण्याचा सल्ला : कोरोनाच्या संसर्गात सुरवातीला वास आणि चव कमी होण्यासारखी लक्षणे ठळकपणे दिसून येत होती. आता मात्र अनेक रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसत नाहीत. बरेच जण सर्दी आणि खोकल्याची तक्रार करतात, त्यामुळे जास्त चाचण्या किंवा सेल्फ आयसोलेशन होत नाही. कोरोना विरुद्धचे लसीकरण अजूनही महत्वाचे आहे. इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी व्हावा म्हणून सावधगिरी बाळगली पाहिजे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार, मागील आठवड्याच्या तुलनेत 10 ते 16 ऑक्टोबर दरम्यान 17 टक्के अधिक कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने ठाणे, रायगड आणि मुंबई या सर्व दाट लोकवस्तीच्या जिल्ह्यांत दिसून आली. हिवाळ्यात आणि सणासुदीच्या हंगामात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, असा इशाराही विभागाने दिला (corona virus infections and hospitalizations) होता.
लसीकरण केलेल्यांना संसर्ग : डॉ. वसंतपुरम रवी, व्हायरोलॉजिस्ट प्रमुख आरडी, टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स (आणि कर्नाटक जीनोमिक सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष) म्हणाले की, विषाणूचा हा नवीन प्रकार आणि रोगाचा जीनोटाइप तीव्रता आणि लक्षणे नसलेल्या स्थितीच्या बाबतीत ओमिक्रॉनपेक्षा वेगळा नाही. हे 3.75 आणि बीजे1 या दोन ओमिक्रॉन प्रकारांचे संकरित आहे. ज्यामुळे त्यात स्पाइक प्रोटीन्समध्ये नवीन उत्परिवर्तन होते. ज्यामुळे ते लसींद्वारे तयार केलेल्या ऍन्टीबॉडीजपासून मुक्त होते. त्यामुळे लसीकरण केलेल्या लोकांमध्येही संसर्ग होत (corona virus infection) आहे.
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक : कोरोना चाचणी अजूनही महत्त्वाची असली तरी त्याची तीव्रता कमी झाल्यामुळे काळजी करण्याची फारशी गरज नाही, असेही डाॅक्टरांनी म्हणाले आहे. जर एखाद्या रुग्णाची चाचणी ओमिक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आली तर त्याला ओमिक्रॉन संसर्गावर उपचार मिळू शकतात. परंतु जर लक्षणे असूनही चाचणीत ओमिक्रॉन सिध्द झाला नाही तर हा नवीन व्हेरिऐंट चा प्रकार असू शकतो. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मास्क घालणे आवश्यक : भारतीय जीनोमिक्स कंसोर्टियमने एका निवेदनात म्हटले आहे की, ते एक्सबीबी आणी एक्सबीबी.1 आणि कोणत्याही नवीन विषाणूंच्या उत्क्रांतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. परंतु कोविड-19 च्या ओमिक्रॉन उप-वंश XBB ची लागण झालेल्या भारतीय रुग्णांना सौम्य आजार आहे. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील संसर्गजन्य रोगांचे सल्लागार डॉ लक्ष्मण जेसानी यांनी सांगितले की, संसर्ग बहुतांशी सौम्य असल्याने रुग्णालयात दाखल होण्याची आणि आयसीयूमध्ये दाखल होण्याची शक्यता कमी आहे. उच्च-जोखीम गट आणि वृद्ध लोकांनी संसर्ग होऊ नये म्हणून बाहेर जाणे टाळावे, विशेषत: गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे आवश्यक आहे. गेल्या काही आठवड्यांत संसर्गात लक्षणीय वाढ झाली (corona virus) नाही , असेही त्यांनी स्पष्ट केले.