मुंबई - मनसेच्या महाअधिवेशनापूर्वीच मनसे चित्रपट कर्मचारी सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. अमेय खोपकर यांची संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे. तर, कार्याध्यक्षपदी शालिनी ठाकरे यांना पुन्हा एकदा जबाबदारी देण्यात आली आहे.
मनसेच्या चित्रपट कर्मचारी कार्यकारिणीत सिने नाट्य कलावंतांचा मोठ्या संख्येने भरणा करण्यात आला आहे. चित्रपट सेनेच्या सल्लागारपदी नेहमीच राज ठाकरे यांच्या जवळचे असलेले महेश मांजरेकर, अतुल परचुरे, अनंत जोग यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी विजय पाटकर, संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री, सायली संजीव, स्मिता तांबे, शर्वणी पिल्लई, विशाखा सुभेदार, उमा सरदेशमुख, रमेश परदेशी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा- दोन पेंशन दोन पगार; वाडिया रुग्णालय ट्रस्टचा मनमानी कारभार