मुंबई : राज्याचे एसटी महामंडळ (ST Corporation) तोट्यात असताना एसटी महामंडळाला भरघोस कमाईची संधी आहे तरी देखील एसटी महामंडळ प्रवाशांची सोय न पाहता किंवा त्यांच्या मनात विचार येईल त्या पद्धतीने अंमल करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक नवीन आदेश जारी केलेला आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळ कर्मचारी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे यांनी या निर्णयाने उत्पन्न कसे वाढणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.(MSRTC News)
एसटी महामंडळाचा नवा आदेश : लोणावळ्याला शनिवार- रविवार मोठ्या संख्येने प्रवासी व पर्यटक जात असतात. शिवाय इतर दिवशी ही मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक प्रवास करत असतात. मात्र परस्पर एक्सप्रेस हायवेने पसार होणाऱ्या एसटीच्या बसेसमुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनांनी जावे लागते. यातून मार्ग काढण्याच्या उद्देशाने प्रशासनाने तसा निर्णय घेतला असल्याचं आदेशात म्हटले आहे. पूर्वी जुन्या हायवे मार्गे सर्व गाड्या चालायच्या. मेगा हायवे झाल्यानंतर हळू हळू सर्व गाड्या त्या मार्गे धावू लागल्या.पण हल्ली प्रवासी उत्पन्न कमी झाल्याने जुन्या मार्गे गाड्या धावण्याच्या निर्णय झाला आहे. यातून प्रवासी उत्पन्न वाढेल व टोल रक्कम कमी होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
कर्मचारी कॉंग्रेसच्या नेत्यांची भूमिका : यासंदर्भात महाराष्ट्र एसटी महामंडळ कर्मचारी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हुबळी, बंगलोर, मंगलोर सर्व गाड्या जुन्या मार्गे गेल्या पाहिजे असे प्रशासनाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. जुन्या मुंबई पुणे हायवे साठी एका बसला रुपये 485 रुपये टोल(जात-येता R) द्यावा लागतो. तर नवीन एक्सप्रेस वे ने जाण्यासाठी त्याच बसला रुपये 675 टोल (जाता-येता R) द्यावा लागतो. एका बसमागे एका फेरीला 190 रुपये वाचतात. ह्या बचतीमुळे एसटी महामंडळ फायद्यात येईल असे म्हणणे आहे. पुढे श्रीरंग बर्गे यांनी सांगितले की, दुसरे म्हणजे नवीन एक्सप्रेस वे वरून जाताना पनवेल ते पुणे या तब्बल 130 किलोमीटर अंतरावर एकही प्रवासी चढउतार होत नाही. त्या तुलनेत जुन्या हायवे वरून जाताना खोपोली, लोणावळा, तळेगाव या ठिकाणी प्रवासी चढउतार होतो.