ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : रुग्णसंख्या घटली; सोमवारी राज्यात सहा हजार कोरोनाबाधित, 24 जणांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना आकडेवारी 7 फेब्रुवारी

राज्यात आज (7 फेब्रुवारी) रुग्ण संख्येत कमालीची घट (Corona Update on 7 February) दिसून येत आहे. आज केवळ 6 हजार 436 नवे रुग्ण (New Corona Cases in Maharashtra) सापडले आहेत. तर, 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

corona file photo
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Feb 7, 2022, 9:17 PM IST

मुंबई - राज्यात आज (7 फेब्रुवारी) रुग्ण संख्येत कमालीची घट (Corona Update on 7 February) दिसून येत आहे. आज केवळ सहा हजार नवे रुग्ण (New Corona Cases in Maharashtra) सापडले आहेत. तर, 24 जणांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनचा आज एकही रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

  • राज्यात कोरोना नियंत्रणात -

जानेवारी महिन्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून आरोग्य विभागाने सुटकेचा निःस्वाश टाकला आहे. आज 6 हजार 436 नव्या बाधितांची नोंद झाली. त्यापैकी 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.83 टक्के इतका स्थिर स्थावर आहे. 18 हजार 421 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 75 लाख 57 हजार 34 करोना बाधित बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या बधितांचे प्रमाण यामुळे 96.76 टक्के इतके आहे. 7 कोटी 56 लाख 55 हजार 12 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.32 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 10 हजार 136 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 73 हजार 875 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2338 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 1 लाख 6 हजार 59 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  • ओमायक्रॉनचा आज एकही रुग्ण नाही -

राज्यात ओमायक्रोनचा गेल्या चार दिवसांत एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. राज्याला हा दिलासा असून आजपर्यंत 3 हजार 334 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 2023 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 7014 जणांची जनुकीय चाचणी केली. 6901 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 113 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

  • विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 356
ठाणे - 26
ठाणे मनपा - 61
नवी मुंबई पालिका - 70
कल्याण डोबिवली पालिका - 52
मीरा भाईंदर - 17
वसई विरार पालिका - 22
नाशिक - 208
नाशिक पालिका - 154
अहमदनगर - 787
अहमदनगर पालिका - 298
पुणे - 295
पुणे पालिका - 789
पिंपरी चिंचवड पालिका - 363
सातारा - 191
नागपूर मनपा - 489

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.