मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 666 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात 92 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे ही संख्या वाढली आहे. तर आतापर्यंत राज्यात 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- कोणत्या शहरात रुग्णांची वाढ -
- मुंबई - 72
- औरंगाबाद - 2
- मालेगाव -5
- पनवेल - 2
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका - 1
- ठाणे - 4
- पालघर - 1
- नाशिक ग्रामीण - 1
- नाशिक - 1
- अहमदनगर - 1
- पुणे - 1
- वसई विरार -1