मुंबई : मुंबईत ऑक्टोबर २०२१ मध्ये करीरोड येथील वन अबव्ह या इमारतीला आग लागली होती. या आगीमध्ये आपला जीव वाचवण्यासाठी एका कामगाराने १९ व्या माळ्यावरून उडी मारली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. जुलै २०२२ रोजी भायखळा येथील इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून पडून एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. मार्च २०२३ मध्ये गोरेगाव पूर्व येथील एका इमारतीच्या २० व्या माळ्याच्या बालकनीमधून घसरून १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
दोघांना रेस्क्यु केले : ५ मार्च २०२३ रोजी एक ७० वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती उंच इमारतीच्या २२ व्या मजल्यावरील रेस्क्यु माळ्यावर सज्जावर उतरला होता. त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप रेस्क्यु केले. ७ मार्चला घाटकोपर पंतनगर येथे इमारतीला आग लागली होती. घरामध्ये एकट्या असलेल्या. ३० वर्षीय महिला खिडकीतून सज्जावर गेली. या महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकीतून सुखरूप घरात घेतल्याने तीचा जीव वाचला.
जाळ्या नसलेल्या इमारती धोकादायक : मुंबईत पुनर्विकासाची कामे जोरात सुरू आहेत. उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत. काही वर्षांपूर्वी सर्व इमारतींच्या खिडक्या आणि गॅलरीला लोखंडी जाळ्या म्हणजेच ग्रिल्स बसवल्या जात होत्या. आग लागल्यावर अशा इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत होत्या. त्यामुळे नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील खिडक्या आणि गॅलरीला जाळ्या लावल्या जात नाहीत. यामुळे अनेक अपघात होऊन मृत्यू झाले आहेत. तसेच, काही लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. यामुळे जाळ्या न लावलेल्या इमारती नागरिकांसाठी सुरक्षित आहेत का असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.
सुक्षेसाठी जाळी लावणे योग्य नाही : इमारतीच्या खिडक्यांना जाळी असल्याने आग लागल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांना अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे अडचणीचे ठरते. त्यामुळे जाळी लावताना ती सहज उघडता येईल असे सांगितले जाते. जाळी लावूच नका असे सांगितले जात नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी जाळी लावणे योग्य नाही. यामुळे आग लागल्यावर नागरिकांना बाहेर काढताना अडचणीचे ठरू शकते अशी प्रतिक्रिया मुंबई अग्निशमन दलाचे माजी मुख्य अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले.
हेही वाचा : Rahul Gandhi: अदानी प्रकरणावर पंतप्रधान घाबरले असल्याने मला सभागृहात बोलू देणार नाहीत -राहुल गांधी