ETV Bharat / state

नालेसफाईत निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, सचिन अहिर यांचा इशारा - सचिन अहिर

नालेसफाई कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही अशाच प्रकारची नालेसफाई होत असेल तर राष्ट्रवादी कदापी सहन करणार नाही. १५ जूनपर्यंत नालेसफाई कामांची मुदत आहे. आम्ही पालिकेच्या कारभाराचा पर्दाफाश करु, असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर
author img

By

Published : May 12, 2019, 7:52 AM IST

मुंबई - मुंबईकरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पालिका प्रशासन सातत्याने कानाडोळा करत आहे. पावसाळा तोंडावर आल्याने नालेसफाईची कामे चांगली व्हायला हवीत. मात्र, नालेसफाईत निष्काळजीपणा केला जात आहे. असा निष्काळजीपणा आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे. मुंबईकरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस वॉचडॉगची भूमिका निभावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर

नालेसफाई, पुलाचे ऑडिट आणि पालिकेने संस्थाना दिलेल्या जागांची देखभाल तसेच मुंबईकरांच्या प्रश्नावर सचिन अहिर यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. महापालिका गटनेत्या राखी जाधव यावेळी उपस्थित होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, मुंबईतील काही नाले साफ झाले आहेत. मात्र, काही नाले गाळातच आहेत. आम्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नाल्यातील गाळ आणि सफाई कामांचे फोटो पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यांच्याकडून आलेल्या फोटोवरुन नालेसफाईचा फज्जा उडाल्याचे दिसते. नालेसफाई कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही अशाच प्रकारची नालेसफाई होत असेल तर राष्ट्रवादी कदापी सहन करणार नाही. १५ जूनपर्यंत नालेसफाई कामांची मुदत आहे. आम्ही पालिकेच्या कारभाराचा पर्दाफाश करु. नालेसफाईच्या कामात जीपीस प्रणालीचा वापर केला जात आहे. परंतु, गाळ नेमका कुठे टाकला जातो, याची नागरिकांनाही माहिती मिळावी, यासाठी पब्लिक पोर्टलचा वापर करावा. जेणेकरून कामांत पारदर्शकता दिसून येईल आणि नागरिकांना त्याची माहिती मिळेल असे ते म्हणाले.

भाऊ दाजी लाड वास्तूसंग्रहालयात झालेल्या दुर्घटनेत डॉ. अल नवाज हवेवाला यांच्या मृत्यूचा दाखला देत ते म्हणाले, असे प्रकार रोखले पाहिजेत. तसेच पालिकेने ज्या जागा संस्थाना दिल्या आहेत त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली पाहिजे. धोकादायक पुलांच्या ऑडिटच्या कामावरदेखील पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. जेणेकरून मुंबईतील दुर्घटना टळतील आणि नागरिकांचे प्राण वाचतील, अशी मागणी त्यांनी केली. आमच्या विविध मागण्यांना आयुक्त अजोय मेहता यांनी सकारात्मकरित्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प बाधितांना माहुलमध्ये न पाठवता, त्याच वॉर्डात पुनर्वसित करण्याच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे, असे अहिर म्हणाले.

Intro:मुंबई -
मुंबईकरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पालिका प्रशासन सातत्याने कानाडोळा करत आहे. पावसाळा तोंडावर आल्याने नालेसफाईची कामे चांगली व्हायला हवीत. मात्र, नालेसफाईत निष्काळजीपणा केला जात आहे असा निष्काळजीपणा आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे. मुंबईकरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस वॉचडॉगची भूमिका निभावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Body:नालेसफाई, पुलाचे ऑडिट आणि पालिकेने संस्थाना दिलेल्या जागांची देखभाल तसेच मुंबईकरांच्या प्रश्नावर सचिन अहिर यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. महापालिका गटनेत्या राखी जाधव यावेळी उपस्थित होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुंबईतील काही नाले साफ झाले आहेत. मात्र काही नाले गाळातच आहेत. आम्ही जिल्ह्यातील पद्धधिकाऱ्यांना नाल्यातील गाळ आणि सफाई कामांचे फोटो पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यांच्याकडून आलेल्या फोटोवरुन नालेसफाईचा फज्जा उडाल्याचे दिसते. नालेसफाई कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही अशाच प्रकारची नालेसफाई होत असेल तर राष्ट्रवादी कदापी सहन करणार नाही. १५ जून पर्यंत नालेसफाई कामांची मुदत आहे. आम्ही पालिकेच्या कारभाराचा पर्दाफाश करु असे अहिर म्हणाले. नालेसफाईच्या कामात जीपीस प्रणालीचा वापर केला जातो आहे. परंतु, गाळ नेमका कुठे टाकला जातो, याची नागरिकांनाही माहिती मिळावी, यासाठी पब्लिक पोर्टलचा वापर करावा. जेणेकरून कामांत पारदर्शकता दिसून येईल आणि नागरिकांना त्याची माहिती मिळेल असे ते म्हणाले.

भाऊ दाजी लाड वास्तूसंग्रहालयात झालेल्या दुर्घटनेत डॉ. अल नवाज हवेवाला यांच्या मृत्यूचा दाखला देत, असे प्रकार रोखले पाहिजेत आणि पालिकेने ज्या जागा संस्थाना दिल्या आहेत. त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली पाहिजे. धोकादायक पुलांच्या ऑडिटच्या कामावर देखील पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. जेणेकरून मुंबईतील दुर्घटना टळतील आणि नागरिकांचे प्राण वाचतील, अशी मागणी त्यांनी केली. आमच्या विविध मागण्यांना आयुक्त अजोय मेहता यांनी सकारात्मकरित्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प बाधितांना माहुलमध्ये न पाठवता, त्याच वॉर्डात पुनर्वसित करण्याच्या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे, असे अहिर म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.