ETV Bharat / state

'नीट'ची परीक्षा सुरळीत; जीवशास्त्राचा पेपर कठीण, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया - नीट

राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत होती. विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न सोप्पे गेले. मात्र, जीवशास्त्राच्या ४ प्रश्नांनी विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढलवली.

फाईल फोटो
author img

By

Published : May 6, 2019, 9:11 AM IST

मुंबई - वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत रविवारी देशभरात घेण्यात आलेली नीट प्रवेश पात्रता परीक्षा सुरळीत पार पडली. मुंबई, पुणे आदी काही ठिकाणी विद्यार्थी वेळेत न पोहोचल्याने, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले ओळखपत्र सोबत न आ‍णल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. मात्र, या परीक्षेत रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा पेपर सोपा गेला असला तरी जीवशास्त्राचा पेपर अवघड गेल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.

राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत होती. विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न सोप्पे गेले. मात्र, जीवशास्त्राच्या ४ प्रश्नांनी विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढलवली. यंदा जीवशास्त्राची प्रश्नपत्रिका कठीण काढण्यात आली असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून ऐकण्यास मिळाली.

नीट परीक्षेच्या निकालावरच मेडिकल प्रवेश आधारीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या परीक्षेत राज्यातून जवळपास २ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मुंबईत भवन्स महाविद्यालयात ही परीक्षा झाली. या केंद्रातील वैभव जैन या विद्यार्थ्याला परीक्षाबाबत विचारले असता तो म्हणाला, ८० टक्के प्रश्न अभ्यासक्रमातील होते, तर २० टक्के प्रश्न बाहेरील होते. त्यामध्ये जीवशास्त्र विषयाचा समावेश होता. त्यामुळे ते प्रश्न सोडवण्यात अनेक विद्यार्थ्यांना अडचण आली.

Intro:नीटची परीक्षा झाली सुरळीत, मात्र बायोलॉजीचा पेपर गेला कठीण Body:नीटची परीक्षा झाली सुरळीत, मात्र बायोलॉजीचा पेपर गेला कठीण
(कृपया यासाठी लोगोचे चित्र लावून बातमी चालवावी)
मुंबई, ता. ५ :
देशातील वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत आज देशभरात घेण्यात आलेली नीट प्रवेश पात्रता परीक्षा सुरळीत पार पडली. मुंबई, पुणे आदी काही ठिकाणी विद्यार्थी वेळेत न पोहोचल्याने काहींना परीक्षेपासून रोखण्यात आल्याचे तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले ओळखपत्र सोबत न आ‍णल्याने त्यांना रोखल्याच्या घटना समोर आल्याचे सांगण्यात आले. मात्र या परीक्षेत केमेस्ट्री आणि फिजिक्सचा पेपर सोपा गेला असला तरी बायोलॉजीचा पेपर अवघड गेल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.
राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत होती. विद्यार्थ्यांना फिजिक्स आणि केमेस्ट्री विषयाचे प्रश्न सोप्पे गेले मात्र बायोलॉजीच्या चार प्रश्नांनी विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढलवली. यंदा बायोलॉजीची प्रश्नपत्रिका कठीन काढण्यात आली असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून ऐकण्यास यावेळी मिळाली. नीट परीक्षेच्या निकालावरच मेडिकल प्रवेश आधारीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या परीक्षेत राज्यातून जवळपास २ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मुंबईत भवन्स महाविद्यालयात ही परीक्षा जाली. या केंद्रातील वैभव जैन या विद्यार्थ्याला परीक्षाबाबत विचारले असता तो म्हणाला, ८. टक्के प्रश्न अभ्यासक्रमातील होते तर २० टक्के प्रश्न बाहेरील होते. बायोलॉजीचे प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरील होते. त्यामुळे ते प्रश्न सोडविण्यात अनेक विद्यार्थ्यांना अडचण आली. दुस-या एका विद्यार्थ्याला विचारले असता तो म्हणाला की, बहुतेक प्रश्न हे अभ्यासक्रमातूनच विचारण्यात आल्यामुळे यंदा नीट परीक्षेचा निकाल चांगला लागेल, अशी प्रतिक्रियाही विद्यार्थ्यांनी दिली.Conclusion:नीटची परीक्षा झाली सुरळीत, मात्र बायोलॉजीचा पेपर गेला कठीण
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.