मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर टिका-टिप्पणी करण्याची निलेश राणेंची ( Nilesh Rane ) लायकी नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( NCP Spokesperson Mahesh Tapase ) यांनी भाजप नेते निलेश राणेंवर टीका केली. महेश तपासे म्हणाले की, गेली ५५ वर्षे पवारसाहेबांनी महाराष्ट्राची व देशाची समाजसेवेतून, राजकारणाच्या माध्यमातून अविरत सेवा केली आहे आणि आजही करत आहेत. हे कदाचित निलेश राणेंना माहीत नाही. पवार साहेबांच्या केसाएवढी देखील उंची किंवा लायकी निलेश राणेंची असती तर ते यशस्वी राजकारणी दिसले असते, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.
Mahesh Tapase on Nilesh Rane : शरद पवारांवर टिका-टिप्पणी करण्याची निलेश राणेंची लायकी नाही - महेश तपासे - महेश तपासे निलेश राणेंना प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर टिका-टिप्पणी करण्याची निलेश राणेंची ( Nilesh Rane ) लायकी नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( NCP Spokesperson Mahesh Tapase ) यांनी भाजप नेते निलेश राणेंवर टीका केली.