मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ३१ ऑक्टोबरला रुग्णालयात दाखल ( Sharad Pawar discharged from Hospital ) झाले होते. राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिरात दुसऱ्या दिवशी सहभागी झाले होते. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या आठ दिवसापासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार हे उपचार घेत होते. 31 ऑक्टोबरला प्रकृती अत्यावस्थ कारणामुळे त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू: शरद पवार यांना निमोनिया झाला होता. त्यावर ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र या उपचारादरम्यानही राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि पाच नोव्हेंबरला झालेल्या शिबिरात पहिल्या दिवशी ऑनलाइन तर दुसऱ्या दिवशी थेट उपस्थिती दर्शवली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा ते ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना आज डिस्चार्ज दिला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत शरद पवार हे आपल्या मुंबईच्या सिल्वर ओक निवासस्थानी गेले आहेत.
शरद पवार यांची प्रकृती स्थिर : शरद पवार रुग्णालयात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते यावेळी रुग्णालयातून त्यांची विचारपूस करून बाहेर येताना प्रसार माध्यमांना त्यांनी शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. राष्ट्रवादीच्या शिबिराला हजेरी लावल्यानंतर ते पुन्हा एकदा रुग्णालय दाखल होतील अशी माहिती दिली होती. त्यानुसार शिबिरात दाखल झाल्यानंतर शरद पवार रुग्णालयात दाखल झाले. आज शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र सायंकाळी ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या (Breach Candy Hospital) डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केल्यानंतर त्यांना अजून एक ते दोन दिवसाचे उपचार घेण्याचा सल्ला दिला होते. त्यामुळे शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील 4 आणि 5 नोव्हेंबरच्या शिबिराला उपस्थित राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मात्र, ते शिबिरात उपस्थित राहिले होते.
2 नोव्हेंबरलाच मिळणार होता डिस्चार्ज: शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी प्रकृती अस्वस्थेमुळे मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शरद पवार यांच्यावर 2 नोव्हेंबर पर्यंत उपचार केले जाणार असून त्यांना 2 नोव्हेंबरलाच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आली होती. मात्र आज पुन्हा एकदा शरद पवार यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना अजून दोन दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला होता.