ETV Bharat / state

Maharashtra Politics Crisis : राष्ट्रवादी कुणाची? काकांची की पुतण्याची; केंद्रीय निवडणूक आयोगाची दोन्ही पवार गटांना नोटीस - महाराष्ट्रीतील सत्ता संघर्ष

अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस पाठवली आहे. तसेच निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे एकमेकांना देण्यास सांगितली आहेत. तीन आठवड्यात दोन्ही गटाने कागदपत्रे एकमेकांना कागदपत्रे द्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस
निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस
author img

By

Published : Jul 27, 2023, 7:33 AM IST

Updated : Jul 27, 2023, 8:20 AM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे, याची कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला व अजित पवार गटाला नोटीस पाठवली आहे. अजित पवारांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवार गट आणि अजित पवार गटाने सादर केलेली कागदपत्रे एकमेकांना दाखवावीत, असे निर्देश निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना दिले. दोन्ही गटांनी एकमेकांना कागदपत्रे दाखवलीत याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाचे निर्देश: महाराष्ट्रातील राजकारणात दोन मोठे भूकंप झाले आहेत. या भूकंपामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय वर्तुळात परिणाम झाला. शिंदेंच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटाने बंड पुकारत भाजप आणि शिंदेच्या गटासह सरकारमध्ये सामील झाले. बंडानंतर खरा राष्ट्रवादी पक्ष म्हणजे आपणच असल्याचा दावा काका शरद पवार आणि पुतणे अजित पवारांकडून केला गेला. त्याप्रकरणी दोन्ही गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे देण्यात आली आहेत. आता निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या याचिकेची दखल घेत शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे.

दोन्ही गटाकडून याचिका: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याच्या दोन दिवसाआधी अजित पवार यांनी यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले होते. त्या पत्रात अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि 'घड्याळ' चिन्हावर दावा केला होता. राष्ट्रवादीतील बहुतांश आमदार,पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह आम्हाला द्यावीत अशी याचिका अजित पवार गटाकडून करण्यात आली होती. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. कारण 1968 च्या चिन्ह आदेशातील तरतुदीनुसार मला पक्षाचे चिन्ह देण्यात यावे, असे अजित पवारांच्या याचिकेत म्हटले होते. त्यानंतर शरद पवार गटानेही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय अजित पवारांच्या याचिकेवर कोणताच निर्णय देऊ नये असे कॅव्हेट शरद पवार यांच्याकडून दाखल करण्यात आले. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. यासाठी काही वेळही देण्यात आला आहे. यानंतर निवडणूक आयोग अजितदादांच्या गटाला देखील नोटीस पाठवली जाऊ शकते.

एका महिन्यापूर्वी सत्तेत सामील: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 8 आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे काका शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये फूट पाडली आहे. शिंदे सरकारच्या काळात सुरुवातीचे एक वर्ष अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिले. पण गेल्या महिन्यात ते सत्तेत सामील झाले. 2 जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या नेत्यांचे खातेवाटप देखील झाले होते.

हेही वाचा-

  1. Ajit Pawar CM Post : भाकरी फिरणारच? मुख्यमंत्री बदलाची चर्चा जोरात; ठाकरे गटाला 'हा' विश्वास
  2. Sunil Tatkare : अजित पवार मुख्यमंत्री होणार? सुनील तटकरेंनी थेटच सांगितले...Watch Video

Last Updated : Jul 27, 2023, 8:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.