मुंबई : अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावर सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्या म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. रविवारची घटना वेदनादायी आहे. संघर्ष प्रत्येकाचा आयुष्यात येत असतो त्यातून मार्ग काढायचा असतो. नव्या उमेदीने पक्ष बांधणी करू या. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आमची प्रेरणा आहे. गेले त्याची चिंता नाही. मात्र त्यांच्या भविष्याची चिंता आहे. अजितदादा कायम माझा मोठा भाऊच राहणार आहे. नात्यात आणि कामात गल्लत नको याची जाणीव मला आहे.
राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष म्हणणारे : वारंवार राष्ट्रवादी पक्षाला भ्रष्टाचारी पक्ष म्हणणाऱ्या भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्री केले. बहुमत असूनही निवडणुका जिंकण्याचा विश्वास भाजपाला नसल्यामुळेच भाजपने असे पाऊल उचलले असावे, याविषयीचे अधिक उत्तर भाजपच देऊ शकतो. माझ्यात आणि दादात कधी वाद नव्हता. मी पक्षासोबत आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष असल्याचे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्षविरोधात कारवाई करून शपथ घेतली आहे. त्यांनी केलेली कृती बेकायदेशीर असून नऊ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
9 आमदार म्हणजे पक्ष नाही : पक्षाला अंधारात ठेवल्याने एका सदस्याच्या शिस्तभंग समितीकडे आलेल्या तक्रारीवरून 9 सदस्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याबाबतची मागणीचे पत्र विधानसभा अध्यक्षांना ईमेल आणि व्हॉटस्ॲपवरद्वारे आणि त्यांच्या आय मेसेजवरदेखील पाठवण्यात आले आहे. तसेच निवडणूक आयोगाला देखील कळविण्यात आले आहे. राज्यातील सर्व कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहे. 9 आमदार म्हणजे पक्ष होऊ शकत नाही. घेतलेली शपथ बेकायदेशीर आहे. शपथ घेतलेल्या 9 आमदारावर कायदेशीर कारवाईसाठी पावले उचलले जात आहे. विधानसभा अध्यक्ष आम्हाला लवकरात लवकर बोलवतील अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :