मुंबई : शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवल्याचा दावा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ही बैठक निश्चित करण्यात आली आहे. मुंबईमध्ये बुधवारी शरद पवार आणि अजित पवार यांची समर्थकांसह बैठक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पवारांनी पक्षातील पदाधिकारी, आमदारांसोबत चर्चा देखील सुरू केली आहे. दरम्यान शरद पवार हे बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. सायंकाळी शरद पवार दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत.
-
#WATCH | A meeting of NCP leaders is underway at the residence of party president Sharad Pawar in Delhi.
— ANI (@ANI) July 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He has called the party's National Executive meeting. pic.twitter.com/ah5KxB4aq3
">#WATCH | A meeting of NCP leaders is underway at the residence of party president Sharad Pawar in Delhi.
— ANI (@ANI) July 6, 2023
He has called the party's National Executive meeting. pic.twitter.com/ah5KxB4aq3#WATCH | A meeting of NCP leaders is underway at the residence of party president Sharad Pawar in Delhi.
— ANI (@ANI) July 6, 2023
He has called the party's National Executive meeting. pic.twitter.com/ah5KxB4aq3
पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक : शरद पवार यांनी पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली आहे. पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी शरद पवारांकडून पावले उचलण्यात येत आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच कार्यकारिणीची कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय आज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कार्यकारिणीची कमिटीच्या बैठकीत कोणाचे बहुमत दिसणार यावरही कायदेशीर लढाईचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय कार्यकारणीत अजित पवार यांची बाजू मांडणारे किती पदाधिकारी या बैठकीत असतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
-
#WATCH | NCP national president Sharad Pawar arrives at his residence in Delhi.
— ANI (@ANI) July 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He has called the party's National Executive meeting today. pic.twitter.com/WpgqrR7RB7
">#WATCH | NCP national president Sharad Pawar arrives at his residence in Delhi.
— ANI (@ANI) July 6, 2023
He has called the party's National Executive meeting today. pic.twitter.com/WpgqrR7RB7#WATCH | NCP national president Sharad Pawar arrives at his residence in Delhi.
— ANI (@ANI) July 6, 2023
He has called the party's National Executive meeting today. pic.twitter.com/WpgqrR7RB7
वेगाने पावले उचलायला सुरूवात : राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष यावर अजित पवार यांनी दावा केला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी वेगाने पावले उचलायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती जाहीर केली होती. अजित पवार यांना मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती.
-
#WATCH | NCP national president Sharad Pawar arrives in Delhi for the party's National Executive meeting. pic.twitter.com/DdVXwNa8hl
— ANI (@ANI) July 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | NCP national president Sharad Pawar arrives in Delhi for the party's National Executive meeting. pic.twitter.com/DdVXwNa8hl
— ANI (@ANI) July 6, 2023#WATCH | NCP national president Sharad Pawar arrives in Delhi for the party's National Executive meeting. pic.twitter.com/DdVXwNa8hl
— ANI (@ANI) July 6, 2023
हेही वाचा :
- Maharashtra Political Crisis : मंत्रीपद हुकले, तिकिटाचीही गॅरंटी नाही...राष्ट्रवादीच्या सत्तेतील प्रवेशाने शिंदे गटात अस्वस्थता!
- Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षात पुतण्या पडतोय काकांवर भारी! जाणून घ्या कोणाकडे आहेत किती आमदार?
- Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षात पुतण्या पडतोय काकांवर भारी! जाणून घ्या कोणाकडे आहेत किती आमदार?