मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 54 आमदार निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पहाटेचा शपथविधी फेल गेल्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना हादरा दिला. राष्ट्रवादीत फुट पाडत, आमदारांना सोबत घेऊन शिंदे गट - भाजप सोबत सत्तेत सामिल झाले. 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला होता. तसेच पक्ष आणि चिन्हावर दावा केला. अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दोन दिवसांची मुदत दिली. तसेच पक्ष आणि चिन्ह कोणाचा हे ठरवण्यासाठी जनतेच्या दरबारात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यापूर्वीच अजित पवारांनी 44 आमदारांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञा पत्र घेऊन शरद पवारांना धक्का दिला आहे.
9 आमदारांना कारणे दाखवा नोटीस : राष्ट्रवादीकडून पक्षविरोधी कारवाई प्रकरणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या 9 आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. उर्वरीत 44 आमदारांना बैठकीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, अनेकांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याने बैठकीला उपस्थित राहु शकणार नसल्याचे मेलवरून स्पष्ट केले आहे. नेमके किती जण पवारांच्या बाजूने आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
44 आमदार अजित पवार गटाकडे : सुत्रांच्या माहितीनुसार 44 आमदार अजित पवार गटाकडे आहेत. शरद पवारांकडे 13 आमदारांचे संख्याबळ आहे. अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीतील 54 आमदारांपैकी 44 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. सात ते आठ आमदार प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहणार नाहीत. पुणे, नगर, पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन तर नाशिकमधील एका आमदारांचा यात समावेश असेल.
हेही वाचा :
- NCP Political Crisis: राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण; अजित पवारांनी बोलावली बैठक, 90 टक्के आमदारांचा आहे पाठिंबा
- Maharashtra Political Crisis : शरद पवार आमचे गुरू; आमच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार, प्रफुल्ल पटेल यांचा दावा
- Political Crisis In NCP : १९७८ साली काकांनी केलेल्या बंडाची पुतण्याने केली पुनरावृत्ती