मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शिवसेना भाजपा सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री आणि इतरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यासाठीच शिंदे फडणवीस सरकार सोबत गेले असावे, अशा प्रकारचे तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै जन्मदिन आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वर्षा निवासस्थानाबाहेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर लावले आहेत.
अजित महोत्सव रद्द : संधी आली असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ न शकल्याची खंत अजित पवारांकडून व्यक्त करण्यात आली होती. 22 जुलै अजित पवार यांचा वाढदिवस आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जात असतो. यावर्षी तर अजित महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते. मात्र, इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याने दुर्घटना घडली. त्यामुळे यावर्षी कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करू नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केले आहे. दरवर्षी ज्याप्रमाणे वाढदिवसानिमित्त जो खर्च करतात, तो खर्च इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणीसाठी करावा, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले आहे.
पोस्टरवर काय आहे : अजित पवार यांच्या 'भावी मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख करणाऱ्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सलीम सारंग यांच्यावतीने हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो देखील पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आत्ताच्या राजकारणातील प्रवासादरम्यान मुख्यमंत्री पद त्यांच्यापासून कायमच लपंडाव खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र सध्या राज्यातील शिंदे गटाचे सत्तेतील भवितव्य यावरच अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अवलंबून असणार आहे.
भावी मुख्यमंत्री : मलाही राजकारण माहिती आहे. ते सध्याचे भावी मुख्यमंत्री आहेत. पण, जास्त दिवस भावी मुख्यमंत्री राहणार नसून लवकरच ते राज्याचे मुख्यमंत्री होणार, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. कायदेशीर, राजकीय काय घडामोडी घडत आहेत, त्या सगळ्या मला माहिती आहेत. भविष्यातील ते मुख्यमंत्री आहे. मी पहिल्या दिवशी सांगितले होते की, महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा :