ETV Bharat / state

Supriya Sule : 'महाराष्ट्र न कभी झुका हैं, न कभी झुकेगा', सुप्रिया सुळे गरजल्या ; म्हणाल्या, 'दडपशाही विरोधात..' - राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात निदर्शने केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या निदर्शनात सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला 'दडपशाही विरोधात झुकणार नाही', असे ठणकावले.

Supriya Sule
सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jun 20, 2023, 7:51 PM IST

सुप्रिया सुळे

मुंबई : गेल्या वर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले. 40 आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिंदेंच्या या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. हा दिवस शिंदे गट 'स्वाभिमान दिन' म्हणून साजरा करत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'गद्दार दिन' म्हणून साजरा करत आहे.

राष्ट्रवादीची सरकार विरोधात घोषणाबाजी : शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर 'जागतिक गद्दार आणि खोके दिन' साजरा केला. मंगळवारी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस भवन समोर जमले होते. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये मोठमोठे खोके होते. त्यावर निषेधाचा संदेश लिहिला होता. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या निदर्शनात सहभाग घेतला. यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

'दडपशाही विरोधात झुकणार नाही' : यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'आम्हाला जर आंदोलन करायला रस्त्यावर परवानगी मिळत नसेल तर ही दडपशाही आहे. या दडपशाही विरोधात आम्ही कोणतीही किंमत मोजावी लागली तरी लढत राहणार. दडपशाही विरोधात महाराष्ट्र 'न कभी झुका हैं, न कभी झुकेगा', असे त्यांनी ठणकावले. जे गद्दार असतील त्यांना गद्दार म्हणायची ताकद माझ्यात आहे. हिम्मत असेल पोलिसांनी आम्हाला जेलमध्ये टाकावे. आम्ही जेलमध्ये आंदोलन करू. खरं बोलण्यास कोणीही कधीही कुठे घाबरू नये, असे त्या म्हणाल्या.

खोक्यावरून आरोप प्रत्यारोप : सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, शिंदे सरकार मधील मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. ते इतके खरे आहेत की, त्यांनी 50 खोक्यांची ऑफर दिल्याचे टीव्ही चॅनलवर सांगितले. देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सांगितले पाहिजे तुमच्या सरकारमधील मंत्री करप्शनची ऑफर देतात, असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

हेही वाचा :

  1. Traitors Day : 'देशद्रोही दिन' साजरा करण्याच्या आवाहनावरून उद्धव गट, राष्ट्रवादीला पोलिसांची नोटीस
  2. NCP Protest : राष्ट्रवादीने केली पन्नास खोक्यांची होळी ; जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'गद्दारी करणारे..'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.