मुंबई Jitendra Awhad : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण तापल आहे. कायदा सुव्यवस्था, बेरोजगारी तसेच ड्रग प्रकरण सरकार सगळ्याच ठिकाणी अपयशी होत, असल्याचा वारंवार विरोधकांकडून आरोप होत आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून बिअरचे दर स्वस्त केले जाणार आहे. सरकारच्या बिअर, वाईन धोरणविषयीं शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला उपरोधीक टोला लगावला आहे.
राज्यात बिअरचा खप वाढवण्यासाठी समीती : राज्यात बिअर स्वस्त करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आपल्या राज्यात बिअरचा खप कमी झाला आहे. बिअरचा खप वाढवा म्हणून सरकरानं एक समिती स्थापन केली आहे. राज्यात लोक दुखी आहे, पाणी नाही, शेतीत उत्पादन नाही, नोकऱ्या जातं आहे, कंपन्या बंद पडताय. मात्र, त्यावर विचार करण्याच ऐवजी नागरिकांनी संध्याकाळ कशी घालवायची यासाठी सरकार विचार करतंय. म्हणूनच त्यांनी बिअरचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत बोलत होते.
'वारे शिंदे तेरा खेल, सस्ता बेवडा महंगा तेल' : 1977 साली जयप्रकाश नारायण यांनी एक घोषणा दिली होती. 'वारे इंदिरा तेरा खेल, स्वतः बेवडा मेहंगा तेल' ही घोषणा देशभर गाजली. त्यामुळं इंदिरा गांधी यांना पराभव पत्करावा लागला. तंसच आपल्याला देखील गावा- गावात तरुण, पुरुष, महिलांना जाऊन सांगावं लागेल, सांगावे लागेल. 'वारे शिंदे तेरा खेल, सस्ता बेवडा महंगा तेल'. राज्यात तेलाचे भाव गगणाला भिडले आहेत, दाळीचे भाव, खाण्याच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र राज्यातील नागरिकांनी यावर विचार करु नेये. त्यांनी रात्री स्वस्त बिअर प्यायची अन् शांत झोपायचं असं आव्हाढ यांनी म्हटलंय.
बिनधास्त वाईन प्या : सरकारची नवीन पॉलिसी येत आहे. विमानतळवर वाईनची दुकानें खाजगीकरणाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. विमानतळावरून आता पाण्या ऐवजी वाईनच मिळणार आहे. लोकांना खुश ठेवाण्यासाठी या सरकारच्या करामती सुरु असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हेही वाचा -