ETV Bharat / state

MLC Election 2022 : राष्ट्रवादीकडून परिषदेवर एकनाथ खडसे यांना संधी देण्याची शक्यता - राष्ट्रवादी

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार ( MLC Election 2022 ) आहे. यामध्ये कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड हे दोन आमदार आहेत. यापैकी रामराजे निंबाळकर यांचे नाव विधानपरिषदेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून निश्चित मानले जात आहे. मात्र, संजय दौंड यांच्या जागी एकनाथ खडसे यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Jun 7, 2022, 12:23 PM IST

मुंबई - विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार ( MLC Election 2022 ) आहे. यामध्ये कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड हे दोन आमदार आहेत. यापैकी रामराजे निंबाळकर यांचे नाव विधानपरिषदेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून निश्चित मानले जात आहे. मात्र, संजय दौंड यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) पक्षात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. भरतीत जनता पक्षातून राष्ट्रवादीत सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर राष्ट्रवादीकडून संधी दिली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

एकनाथ खडसे यांना विधान परिषदेत संधी देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या चर्चा झाली असल्याचे ही माहिती समोर येत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात झालेल्या वादानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये राष्ट्रवादीकडून स्थान देण्यात आले होते. मात्र, राज्यपालांनी अद्यापही राज्य सरकारने दिलेल्या यादीवर आक्षेप घेत, त्यावर सही केलेली नाही. त्यामुळे अद्यापही राज्यपाल नियुक्त आमदार विधानपरिषदेत जाऊ शकले नाहीत. त्यामुळे 20 जूनला विधानपरिषदसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून एकनाथ खडसे यांना विधान परिषदेत पाठवण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे.

हेही वाचा - MLC Election 2022 : विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर व आमशा पाडवी यांना उमेदवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.