ETV Bharat / state

Ban Indic tales : इंडिक टेल्स वेबसाईटविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी - मुंबई पोलीस आयुक्तालय

इंडीक टेल्स या वेबासाइटने सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे. या वेबसाईटच्या विरोधात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. इंडीक टेल्सवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

इंडीक टेल्सविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
इंडीक टेल्सविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
author img

By

Published : May 31, 2023, 12:30 PM IST

Updated : May 31, 2023, 2:30 PM IST

मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी इंडिक टेल्स या वेबसाईट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्यावतीने मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते. राज्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांनी भेट घेतली आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एका कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले होते. त्यावरुन विरोधी पक्षांनी राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली होती. तो वाद संपत नाही तोच इंडीक टेल्स या वेबासाइटने सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून त्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली आहे.

कारवाईची मागणी : राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्यावतीने मुंबई आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ हे रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून लिखाण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. शिवाय इंडिक टेल्स या वेबसाईटवर बंदी आणून काठोर कायेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

समता परिषद आणि राष्ट्रवादी आक्रमक : गेल्या काही महिन्यापासून राज्यांमध्ये महापुरुषांची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. तात्कालीन राज्यपाल भगतसिंग किश्योरी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात विधान केले होते. त्यानंतर विरोधकांनी राज्यपाल हटाव, अशा पद्धतीचा नारा देत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता एका इंग्रजी वेबसाईटमध्ये समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनासंदर्भात आक्षेपार्ह लिखाण केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेकडून निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेने मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर निदर्शने करत आंदोलन केले. आंदोलनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे याप्रकरणी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ही वेबसाईट बंद करण्यात यावी तसेच लिखाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट : राज्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांनी भेट घेतली. सावित्रीबाई फुले यांच्या बदनामी केल्याप्रकरणी शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट, श्री भारद्वाज, नीना मुखर्जी यांच्यावर कारवाई करावी. याचबरोबर पोर्टलवर बंदी आणावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

वेबसाईटवर काय लिहण्यात आले होते : इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवरील लिखाण करण्यात आले आहे. दरम्यान शरयू फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून इंडिक टेल्स चालवले जाते. सावित्रीबाई फुले यांची शाळा म्हणजे ब्रिटिश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय अशा प्रकारची मांडणी या पोर्टलमधील लेखात करण्यात आली आहे. इंडेक्स टेल्स या वेबसाईटमधील लेख मुखरनिना या नावाखाली नीना मुखर्जी यांनी पोस्ट केल्याचे दिसत आहे. लिखाणच क्रेडिट हे @bhardwajspeeks भारद्वाज नावाच्या ट्विटर अकाउंटला देण्यात आले आहे. सदर ट्विटर अकाउंट चेक केला असता अनेक महापुरुषांच्या विरोधामध्ये संताप जनक लिखाण केले आहे. ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रवादीने मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात लिहिले आहे.

सावित्रीबाई फुले यांची निंदा नालस्ती प्रकार सुरू आहे इंडिक टेल्समध्ये जी पोस्ट आहे त्यात म्हटले सावित्रीबाई फुले यांनी इंग्रज यांची स्तुती करणारी कविता लिहिली. याचा संदर्भ घेऊन बदमाश लोक प्रचार करीत आहेत. मनुवादी शक्तीने 21 व्या शतकात सावित्रीबाई फुले यांच्यावर चिखलफेक करण्याचे काम करत आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्ची केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे. - छगन भुजबळ

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. मनुवादी वृत्ती असलेल्या इंडिक टेल्स या वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी खालच्या पातळीत लिखाण करण्यात आले होते. अतिशय अपमानजनक भाषा या लेखात वापरण्यात आली आहे, हे वेदनादायी असल्याचे भुजबळ म्हणाले. सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणारे लेखन करण्याच्या घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच इंडिक टेल्स वेबसाइटवर बंदी आणावी. लेख लिहिणाऱ्या लेखकावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी या पत्रातून केली आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले. त्यासंदर्भात पत्र पोलिस आयुक्ताना पत्र दिले आहे. पोलीस आयुक्त कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे. आता सध्या अनेक वाचाळवीर झाले आहेत, - विरोधी पक्षनेते अजित पवार

हेही वाचा -

  1. Savitri Bai Phule Jayanti : स्त्रियांसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पहिल्या शिक्षिका, सावित्रीबाई फुले
  2. NCP Protest : सावित्रीबाई फुले-अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवले; राष्ट्रवादीकडून निषेध

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आंदोलन

Last Updated : May 31, 2023, 2:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.