मुंबई - माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीकडून विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
विधानभवन परिसरात वसंत दादा पाटील यांचा पुतळा असून याठिकाणी विधान मंडळाकडून अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विधान भवनातील वरिष्ठ नेत्यांनीही वसंतदादा पाटील यांना अभिवादन केले.
हे वाचलं का? - ...तर कुणी माईचा लाल निवडून येणार नाही - अजित पवार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ती संपल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व आमदार विधान भवन परिसरात पोहोचले होते. या आमदारांनीही वसंतदादा पाटील यांना अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे हे सर्व आमदार पवार यांच्यासोबत विधान भवनात पोहोचले. विधान भवनाच्या पायऱ्यावर पवारांच्या उपस्थितीत एक फोटोसेशन करण्यात आले.