ETV Bharat / state

लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी... सुप्रिया सुळेंची शरद पवारांना 'सलामी' - bjp

सुप्रिया सुळेंनी आपले वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी ट्विटरवरून एक भावनीक पोस्ट लिहली आहे. रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!! अशा ओळी लिहीत त्यांनी शरद पवारांना सलामी दिली आहे.

सुप्रिया सुळेंची शरद पवारांसाठी भावनीक पोस्ट
author img

By

Published : May 24, 2019, 9:00 PM IST

मुंबई - बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकील्ला समजला जातो. हा बालेकिल्ला शाबूत राखण्यात सुप्रिया सुळेंना यश आले आहे. तब्बल दीड लाख मतांनी त्यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला. त्यानंतर आज सुप्रिया सुळेंनी आपले वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी ट्विटरवरून एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!! अशा ओळी लिहीत त्यांनी शरद पवारांना सलामी दिली आहे.

mumbai
सुप्रिया सुळेंची शरद पवारांसाठी भावनीक पोस्ट

यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत बारामती जिंकण्यासाठी भाजपने आपली जोरदार ताकद पणाला लावली होती. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात प्रचारसभा घेतली होती. भाजपाच्या बड्या नेत्यांनी लक्ष घातल्याने यंदा प्रथमच बारामतीत राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, सुप्रिया सुळेंना आपला गड शाबूत राखण्यात यश आले.

यावेळी राष्ट्रवादीने एकूण 19 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या ४ जागा त्यांना जिंकता आल्या. २०१४ ला जिंकलेल्या मतदारसंघापैकी माढा आणि कोल्हापूर हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीला यावेळी गमवावे लागले.

Intro:Body:

state 004

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.