ETV Bharat / state

काँग्रेस मंत्र्यांना सरकारकडून कमी निधी; यावर जयंत पाटील म्हणाले.. - जयंत पाटील पत्रकार परिषद

राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांना निधी दिला जात नाही, या वक्तव्याचे खंडण केले आहे. राज्यात कोरोना काळात ज्या विभागांना प्राधान्यानं निधी देण्याची गरज‌ आहे, त्यांना वेळेवर निधी दिला जातोय. तसेच महाविकास आघाडी सरकारला मस्ती आली आहे या फडणवीसांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्तुत्तर दिले आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील
जलसंपदा मंत्री जयंत पाटील
author img

By

Published : Nov 19, 2020, 5:56 PM IST

Updated : Nov 19, 2020, 6:48 PM IST

मुंबई - काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारकडून कमी निधी मिळतोय, असे विधान काँग्रेसकडून करण्यात आले होते. त्यानंतर नीधी मिळत नसल्यानेच राज्यातील वीज सवलतीचा विषय रखडला असल्याची चर्चा सुरू झाली. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र काँग्रेसच्या मंत्र्यांच्या विभागाला निधी कमी मिळतो, हे चुकीचे असल्याचा दावा केला. राज्यात कोरोना काळात ज्या विभागांना प्राधान्यानं निधी देण्याची गरज‌ आहे, त्यांना वेळेवर निधी दिला जातोय. यामुळे कोणाला कमी आणि कोणाला जास्त असा विषय नसल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

वीजबिलाचा मुद्दा टाळला-

मागील दोन दिवसात ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि वीज बिलातील सवलतीच्या संदर्भात पाटील यांना विचारणा केली असता, त्यावर आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी भाष्य करण्याचे टाळले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी मंत्र्यांना निधी कमी दिला जातो हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण दिले.

मुंबई पालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्रच?

बुधवारी भाजपाच्या झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेत भाजपाचा झेंडा फडकावला जाईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, तसेच महविकास आघाडी सरकारला मस्ती आलीय, असेही विधान केले होते. त्यावर विचारले असता, जयंत पाटील म्हणाले फडणवीस यांना आपला पक्ष चालवायचा आहे. त्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेचे मतदान होण्यापूर्वी असे बोलावे लागते. मुंबईत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलोय त्याच पार्श्वभूमीवर आम्ही सर्व विचार करतोय, मुंबई महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही मोठे पक्ष आहेत, आम्ही सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

म्हणून राज्यात सत्तातर झाले-

महाविकास आघाडीला मस्ती येण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या सरकारच्या एकाही मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी आणि सरकारनेही तसे वर्तन केलेले नाही. मागच्या पाच वर्षात फडणवीस सरकारच्या काळात, जे घडले त्यातून लोकांनी निष्कर्ष काढला आणि राज्यात सत्तांतर केले, असल्याचा टोला त्यांनी लगावला. एसटीच्या कर्मचाऱ्यांना सरकारने वेतन दिले, त्यावर विचारले असता पाटील म्हणाले, त्याचे वेतन झाले पाहिजे. आम्ही सरकारने मिळून एकत्र निर्णय घेतला होता, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Last Updated : Nov 19, 2020, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.