ETV Bharat / state

Eknath Khadse Critics : मी सुरत अन् गुवाहाटी तपासले मात्र, मंत्री काही मिळेच ना! एकनाथ खडसेंची खोचक टीका

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मी सुरत आणि गुवाहाटी तपासले. मात्र, मंत्री तिथेही नाहीत; मग मंत्री गेले कुठे, असा खोचक टोला खडसे यांनी लगावला.

Eknath Khadse Critics
एकनाथ खडसे
author img

By

Published : Mar 20, 2023, 5:25 PM IST

मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असताना, एकही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेला नाही. मी सुरत व गुवाहाटी तपासले, मात्र मंत्री तिथेही नाहीत, मग मंत्री गेले कुठे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावत राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

सभागृहात जोरदार टीका : पूर्वी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशा स्वरूपाचा त्या कालखंडात म्हटले जाईल. आता काळ बदलला आहे. मात्र, त्या परिस्थितीमध्ये शेतकरी पारतंत्र्यात तरी मनाने समाधानी होता. उत्पन्न जरी कमी असले तरी पोटाला पुरेसे अन्न मिळत होते. त्याकाळी आत्महत्या केल्याचे एकही उदाहरण नव्हते. पूर्वीच्या परिस्थितीत बदल झाला देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्य झाला. शेतकऱ्यांविषयीचे पूर्णपणे माहिती घेऊनच आज शेतकऱ्याकडे झालेल्या दुर्लक्षाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सभागृहात काय म्हणाले खडसे : एकनाथ खडसे म्हणाले की, शेतकरी मेहनत करत असला तरी महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. शेती करणे त्याला सध्या परवडणार नाही. दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रसंग प्रश्न त्याच्या समोर उभा ठाकला आहे. आताचे सरकार महाविकास आघाडी सरकारच्या काळातील नेत्यांवर आरोप करत आहेत. गेल्या सात महिन्यात हा प्रश्न उद्भवला, असे म्हणणार नाही. परंतु आघाडी सरकारमध्ये देखील आताचे मंत्री कार्यरत होते. निम्म्यापेक्षा जास्त मंत्री तिकडचे इकडे आहेत. मागच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यात सहभागी होतात. त्यांनी काही चुका केल्या असतील तर तुम्ही त्यात भागीदार आहात. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप करण्याचा अधिकार आता शिंदे सरकारला नाही, अशा शब्दांत जोरदार हल्लाबोल खडसे यांनी केला.

राज्यातील मंत्री गेले कुठे? : खडसे पुढे म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकरी हैराण झाला आहे. पिके जमिनीवर पडली आहेत. द्राक्ष, मिरची फळबागांच्या फळबागाची पीके जवळपास नष्ट झाली आहेत. मागील पंधरा दिवसात एकही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले नाहीत. शेतमालाचे नुकसान होत असताना मंत्री कुठे गेले? गुवाहाटी, सुरतला चौकशी केली. सी आर पाटील यांच्याकडे चौकशी केली. त्याने देखील तिकडे मंत्री नसल्याचे सांगितले त्यामुळे राज्यातील मंत्री गेले कुठे, असा खोचक टोला खडसे यांनी लगावला.

पंचनामे कोण करणार? : एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानाकडी लक्ष द्यायला वेळ नाही. संप सुरू असल्याने तलाठी कामावर नाहीत, अशा स्थितीत पंचनामे कोण करणार? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. तसेच पंचनामे करायला अधिकारी येणार नसेल तर शेतकऱ्यांनी नुकसान झालेले पीक तसेच ठेवायचे का? त्यांनी शेती साफ केली तर नुकसान झाले नाही, असे सांगितले जाईल. शेतकऱ्यांकडे सरकारकडून मदत मिळणार नाही. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी परिषदेत केली.

कर्ज माफ करा : एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या हजार कोटीचे कर्ज माफ करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, निरव मोदी यांच्यासारखे लोक पैसे बुडवून पळाले आहेत. सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करू नका. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, खताचे भाव कमी करून कापसाला अनुदान द्या, आणि मागच्या सरकारने काय केले यांचे उणिधुनी काढू नका, असा सल्ला खडसे यांनी सरकारला दिला.

हेही वाचा : Ajit Pawar on State Govt : अवकाळी पावसाच्या नुकसानीवरून अजित पवारांचा सरकारला सवाल, म्हणाले, 'शेतकऱ्यांनी नवीन...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.