ETV Bharat / state

...अन् अजित पवारांना रडू कोसळले, म्हणाले आम्हालाही भावना असतात - अजित पवार भावूक

निवडणुकीच्या निमित्ताने २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा विषय समोर आणला जातो. जनतेला वाटेल की अजित पवारांना हजार कोटींशिवाय दुसरे काय सूचते का नाही, असे म्हणत अजित पवार भावनिक झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.

अजित पवार
author img

By

Published : Sep 28, 2019, 6:17 PM IST

Updated : Sep 28, 2019, 10:43 PM IST

मुंबई - अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा का दिला? याची उत्सुकता सर्वांना लागली होती. आज (शुक्रवारी) दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी बोलत असताना अजित पवारांना अश्रू अनावर झाले.

अजित पवारांना रडू कोसळले

हेही वाचा - या आधीही अजित पवारांनी तडकाफडकी दिला होता राजीनामा !

निवडणुकीच्या निमित्ताने २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा विषय समोर आणला जातो. जनतेला वाटेल की अजित पवारांना हजार कोटींशिवाय दुसरे काय सूचते का नाही, असे म्हणत अजित पवार भावनिक झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. शिखर बँक प्रकरणात शरद पवार संचालक पदावर नव्हते, सभासद नव्हते त्यांचा यात कोणताही संबंध नाही, तरीही त्यांचे नाव या प्रकरणात आणले. हा त्यांचा बदनामीचा डाव आहे. या प्रकारामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो, व्यथित झालो असे ते म्हणाले. हे सगळे बोलत असताना अजित पवार भावूक झाले.

हेही वाचा - चिखली विधानसभा : काँग्रेस आमदार बोन्द्रेंची हॅट्रीक भाजप रोखणार का?

अजित पवार यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ईडी चौकशीच्या सामोरे जाण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे समर्थन केले. त्यानंतर सायंकाळी अजित पवारांनी राजीनामा दिल्याची माहिती आली. मात्र, शरद पवार साहेंबाच्या ईडी चौकशी प्रकरणामुळे दादा अस्वस्थ होते. ईडीच्या चौकशीमुळे आपल्या कुटुंबातील प्रमुखाला या वयात तोंड द्यावे लागले. या गोष्टीमुळे अजित पवार भावनिक झाले होते. त्यामुळे आज त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Intro:Body:

.....आणि अजित पवारांना रडू कोसळले, गृहकलह नसल्याचंही केलं स्पष्ट

मुंबई - अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा का दिला? याची उत्सुकता सर्वांना लागली होती. आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी बोलत असताना अजित पवारांना अश्रू अनावर झाले.

निवडणुकीच्या निमित्ताने २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा विषय समोर आणला जातो. जनतेला वाटेल की अजित पवारांना हजार कोटींशिवाय दुसरे काय सूचते का नाही, असे म्हणत अजित पवार भावनिक झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.  शिखर बँक प्रकरणात शरद पवार संचालक पदावर नव्हते, सभासद नव्हते त्यांचा यात कोणताही संबंध नाही, तरीही त्यांचे नाव या प्रकरणात आणले. हा त्यांचा बदनामीचा डाव आहे. या प्रकारामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो, व्यथित झालो असे ते म्हणाले. हे सगळे बोलत असताना अजित पवार भावूक झाले.

अजित पवार विधानसभेचा राजीनामा दिला. ईडी चौकशीच्या सामोरे जाण्याची भूमिका घेतली. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे समर्थन केले. त्यानंतर सायंकाळी अजित पवारांनी राजीनामा दिल्याची माहिती आली. मात्र शरद पवार साहेंबाच्या ईडी चौकशी प्रकरणामुळे दादा अस्वस्थ होते. ईडीच्या चौकशीमुळे आपल्या कुटुंबातील प्रमुखाला या वयात तोंड द्यावे लागले. या गोष्टीमुळे अजित पवार भावनिक झाले होते. त्यामुळे आज त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Sep 28, 2019, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.