मुंबई - साताऱ्यातील सभेमुळे शरद पवार सध्या सोशल मीडियात ट्रेंडिगमध्ये आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी प्रचंड पावसाची फिकीर न करता शरद पवार सभेमध्ये बोलत राहिले. यामुळे तरुणाईमध्ये ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यांच्या उत्साहाचे, जिद्दीचे अनेकांनी कौतुक केले आहे. यावरच आता राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया टीमकडून कार्टुन काढण्यात आले आहे.
हेही वाचा - ज्या योद्ध्याजवळ उमेद आहे, तो कधीही हारू शकत नाही; सोशल मीडियावर पवारांचा ट्रेंड
या कार्टुनमध्ये महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला असून त्यावर पाऊस पडत असताना शरद पवार हे छत्री धरून उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे.
-
Saheb
— Clyde Crasto (@Clyde_Crasto) October 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
My Artwork#SharadPawar pic.twitter.com/WwkvXZuGSv
">Saheb
— Clyde Crasto (@Clyde_Crasto) October 19, 2019
My Artwork#SharadPawar pic.twitter.com/WwkvXZuGSvSaheb
— Clyde Crasto (@Clyde_Crasto) October 19, 2019
My Artwork#SharadPawar pic.twitter.com/WwkvXZuGSv
हेही वाचा - सलमान खानच्या बॉडीगार्डचा शिवसेनेत प्रवेश, शेवटच्या दिवशी करणार प्रचार
सभेमध्ये सातारा मतदारसंघातून लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उभे असलेले उदयनराजे भोसले यांना शरद पवार यांनी टोला लगावला. 'लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीरपणे कबुल करतो. ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याच्या प्रत्येक माणसाला संधी आहे', असे म्हणत पवार यांनी उपस्थितांना आवाहन केले. सध्या विधानसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे राज्यभरात झंझावाती दौरे चालू आहेत. साताऱ्यात चालू असणाऱ्या सभेत पावसाला सुरुवात झाल्यानंतरही पवार भाषण करत उभे राहिल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला आहे.