ETV Bharat / state

NCP Anniversary : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेला 24 वर्षे पूर्ण, कायमच सत्तेच्या आसपास राहणारा पक्ष म्हणून आहे ओळख!

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये या पक्षाचे एक वेगळे स्थान आहे. स्थापनेपासून हा पक्ष कायमच राज्यातील सत्ताकारणारच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

NCP Anniversary
राष्ट्रवादी काँग्रेस
author img

By

Published : Jun 9, 2023, 10:18 PM IST

प्रवीण पुरव, राजकीय विश्लेषक

मुंबई : 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 24 वर्ष पूर्ण होऊन पक्ष 25 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्या दिवशी सकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयाबाहेर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंतच्या वाटचालीत राष्ट्रवादीने केंद्र असो किंवा राज्यातील सत्ता, नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

केडगाव येथील कार्यक्रम पुढे ढकलला : चालू वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे. या आधी वर्धापन दिनाचा कार्यक्रम अहमदनगर मधील केडगाव येथे आयोजित करण्यात येणार होता. त्या अनुषंगाने पक्षाचे नेते मोठ्या जोमाने कामाला लागले होते. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडल वरून कार्यकर्त्यांना कार्यक्रमात सामील होण्याबाबतचा एक व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आला होता. मात्र हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

स्थापनेपासून कायमच सत्तेच्या आसपास राहिला आहे : महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक वेगळे स्थान आहे. स्थापनेपासून हा पक्ष कायमच राज्यातील सत्ताकारणारच्या केंद्रस्थानी राहिला आहे. 1999 पासून 2014 पर्यंत हा पक्ष कॉंग्रेस सोबत सत्तेत राहिला. 2014 ते 2019 हे पाच वर्ष सोडले असता पुन्हा 2019 मध्ये हा पक्ष महाविकास आघाडी सोबत सत्तेत आला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. महाविकास आघाडीतही हा पक्ष कायमच केंद्रस्थानी राहिला.

राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकण्यासाठी प्रयत्न केले आहेत. केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात इतर पक्षांना एकत्रीत आणण्यामागे शरद पवारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. महाराष्ट्रातील हा एक नेता केंद्रातील सरकार विरोधात ठाम भूमिका घेतो, अशी शरद पवारांची प्रतिमा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा पक्ष चांगल्या गतीने पुढे जाईल व राज्यातील स्थित्यांतरानंतर तो पुन्हा सावरेल, असा मला विश्वास आहे. - प्रवीण पुरव, राजकीय विश्लेषक

राष्ट्रीय पातळीवर अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान : राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यातील राजकारणात आपले स्थान बनवले असले तरी अद्याप हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर अस्तित्व निर्माण करण्यात कमी पडला आहे. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा पक्ष पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष म्हणून उभारून येईल का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सर्व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळणार का? शिंदे सरकारवर वाढता दबाव..
  2. Sharad Pawar death threat : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी...काही घडले तर गृहमंत्रालय जबाबदार-सुप्रिया सुळे
  3. NCP Silver Jubilee Anniversary : राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन, पक्षाची राष्ट्रीय कामगिरी ते राज्य पातळीवर घसरण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.