मुंबई - महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज (दि. २५) पुण्यतिथी आहे. यानिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सकाळी कराडला जाण्यासाठी निघाले आहेत.
कराडच्या प्रीति संगमावरील यशवंतरावांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी दरवर्षी २५ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहतात. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व असा सत्तापेच निर्माण झाला आहे