ETV Bharat / state

निधी चौधरींना राजाश्रय देऊ नये; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ आक्रमक - Chitra Wagh

आयएएस अधिकारी असलेल्या निधी चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून महात्मा गांधी यांच्या विरोधात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये महात्मा गांधी यांच्यावर उपहासात्मातक टीका करण्यात आली आहे. तर नथुराम गोडसे यांचे आभार मानण्यात आले आहेत. चौधरी यांच्या या ट्विटनंतर देशभरात वातावरण तापले आहे.

निधी चौधरींना राजाश्रय देऊ नये; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ आक्रमक
author img

By

Published : Jun 3, 2019, 5:31 PM IST

मुंबई - महात्मा गांधीबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या आयएएस अधिकारी असलेल्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. त्यांना सरकारने राजाश्रय देऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी चौधरी यांच्या विरोधात निदर्शने व ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

निधी चौधरींना राजाश्रय देऊ नये; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ आक्रमक

आयएएस अधिकारी असलेल्या निधी चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून महात्मा गांधी यांच्या विरोधात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये महात्मा गांधी यांच्यावर उपहासात्मातक टीका करण्यात आली आहे. तर नथुराम गोडसे यांचे आभार मानण्यात आले आहेत. चौधरी यांच्या या ट्विटनंतर देशभरात वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रसेचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निधी चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आज मुंबई महापालिका मुख्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना निधी चौधरी यांनी गांधींजीचे पुतळे, नोटांवरील फोटो तसेच रस्त्याला दिलेली नावे हटवावीत असे ट्विट केले. या ट्विटमध्ये नथुराम गोडसे यांचे आभार मानण्यात आले आहेत.

या ट्विटवरून वाद झाल्यावर आता चौधरी यांनी मी गांधीप्रेमी आहे अशी सारवासारव सुरू केली आहे. त्यांचे हे नाटक लोकांना कळले आहे. लोकांच्या संवेदना दुखावल्या आहेत. एका अधिकाऱ्याला त्यांच्या मर्यादा समजायला हव्यात. अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. गेले काही दिवस अशा प्रकारांचे उदात्तीकरण सुरू आहे. त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही अशी खंत वाघ यांनी व्यक्त केली. तर निधी चौधरी या पालिकेत आल्यापासून त्यांची कार्यपद्धत अशीच राहली आहे, नगरसेवकांना त्यांच्या कार्यपद्धतीवर तक्रारी केल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या विरोधात पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार देऊन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा राष्ट्रवादी पक्षाकडून सतत पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण -

१७ मे रोजी निधी चौधरी यांनी "महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे. जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत. तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ३०-१-१९४८ साठी थँक्यू गोडसे", असे वादग्रस्त ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचं छायाचित्र त्यासोबत शेअर केले होते. त्यानंतर त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकांच्या त्यावर संतापजनक प्रतिक्रिया येत असल्याचे पाहून निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले. त्यानंतर सारवासारव करत आपण गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही असे चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Intro:मुंबई
महात्मा गांधीबाबत वादग्रस्त स्वीट करणाऱ्या आयएएस अधिकारी असलेल्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. त्यांना सरकारने राजाश्रय देऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी चौधरी यांच्या विरोधात निदर्शने व ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. Body:आयएएस अधिकारी असलेल्या निधी चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून महात्मा गांधी यांच्या विरोधात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये महात्मा गांधी यांच्यवर उपहासात्मातक टिका करण्यात आली आहे. तर नथुराम गोडसे यांचे आभार मानण्यात आले आहेत. चौधरी यांच्या या ट्विटनंतर देशभरात वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रसेचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निधी चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आज मुंबई महापालिका मुख्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना निधी चौधरी यांनी गांधींजीचे पुतळे, नोटांवरील फोटो तसेच रस्त्याला दिलेली नावे हटवावीत असे ट्विट केले. या ट्विटमध्ये नथुराम गोडसे यांचे आभार मानण्यात आले आहेत. या ट्विटवरून वाद झाल्यावर आता चौधरी यांनी मी गांधीप्रेमी आहे अशी सारवासारव सुरु केली आहे. त्यांची हे नाटक लोकांना कळले आहे. लोकांच्या संवेदना दुखावल्या आहेत. एका अधिकाऱ्याला त्यांच्या मर्यादा समजायला हव्यात. अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना सेवेतून बडतर्फ़ केले पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. गेले काही दिवस अहा प्रकारांचे उदात्तीकरण सुरु आहे. त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही अशी खंत वाघ यांनी व्यक्त केली. तर निधी चौधरी या पालिकेत आल्यापासून त्यांची कार्यपद्धत अशीच राहली आहे, नगरसेवकांना त्यांच्या कार्यपद्धतीवर तक्रारी केल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या विरोधात पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार देऊन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा राष्ट्रवादी पक्षाकडून पाठपुरावा सतत केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण -
१७ मे रोजी निधी चौधरी यांनी ‘महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे. जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे. जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत. तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ३०-१-१९४८ साठी थँक्यू गोडसे.’ असे वादग्रस्त ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचं छायाचित्र त्यासोबत शेअर केलं होतं. त्यानंतर त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकांच्या त्यावर संतापजनक प्रतिक्रिया येत असल्याचे पाहून निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले आहे. त्यानंतर सारवासारव करत आपण गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही असे चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.