ETV Bharat / state

NCP Allegations On Bjp हसन मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपचे कट कारस्थान, राष्ट्रवादीचा आरोप - राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ( ED Raid On Hasan Mushrif ) यांच्या घरावर ईडीने आज सकाळी छापेमारी केली. कागल येथील अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना विक्रीत ( ED Raid On Hasan Mushrif Political Motivated ) हसन मुश्रीफ यांनी 100 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या घरावर टाकण्यात आलेले हे छापे राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh Tapase Allegations On Bjp ) यांनी केला आहे.

ED Raid On Hasan Mushrif
माजी मंत्री हसन मुश्रीफ
author img

By

Published : Jan 11, 2023, 1:51 PM IST

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे

मुंबई - हसन मुश्रीफ यांच्या ( ED Raid On Hasan Mushrif ) घरावर ईडी आणि आयटी अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. मात्र हसन मुश्रीफ यांच्याविरोधात भाजप नेते कट कारस्थान करत असल्याचा आरोप ( ED Raid On Hasan Mushrif Political Motivated ) राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh Tapase Allegations On Bjp ) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

अडचणीत आणण्यासाठी भाजपचे खोटे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरमधील कागल आणि पुणे येथील निवास्थानी आयटी आणि ई डी अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापेमारी केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. हसन मुश्रीफ यांना भारतीय जनता पक्ष अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीने केला आहे. भारतीय जनता पक्षाकडून हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. हसन मुश्रीफ यांना अडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी घेऊन कट कारस्थान केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

कारखान्यात कोणताही घोटाळा झालेला नाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून या आधीही राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख ( Anil Deshmukh Extortion Case ) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Patra Chawl Fraud Case ) यांच्यावर देखील खोटे नाटे आरोप करून त्यांना अटक केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मात्र न्यायालयात त्यांना न्याय मिळाला. आता त्याच पद्धतीने हसन मुश्रीफ यांना अडकवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत. ज्या गडहिंग्लज येथे असलेल्या आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याचा आधार घेत हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्या प्रकरणात कोणताही घोटाळा झालेला नाही. त्यामुळे न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

कागल येथील घरावर छापेमारी आज सकाळी ईडी आणि आयटीच्या अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर छापेमारी केली आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास जवळपास २० अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी केली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना विक्रीत हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी त्यांच्यावर केला आहे.

बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती कागल येथील कारखाना हसन मुश्रीफ यांच्या जावई मतीन मंगोली यांच्या संस्थेला मिळावा यासाठी विक्री प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात आला. मुश्रीफ यांचे जावायाकडून बनावट कंपन्याच्या आधारावर मनी लाँड्रीग करण्यात आली. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना बिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला. बिस्क इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्या मालकीची आहे. कारखाना खरेदीसाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली. बोगस खात्यांमध्ये टाकलेले पैसे मतीन मंगोली यांच्या बिस्क इंडिया कंपनीकडे वळवण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.