मुंबई - शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून कारवाई केली जात आहे. मरोळ, गोरेगाव, माहीम अशा 3 ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान अमली पदार्थांसह 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

ऑटोरिक्षातून पुरवठा -
मुंबईतील मरोळ परिसरामध्ये एनसीबीच्या पथकाने छापेमारी करून सचिन तुपे नावाच्या अमली पदार्थ तस्कराला अटक केली. त्याच्या ताब्यातून एलएसडीच्या 11 ब्लॉट्स जप्त करण्यात आल्या आहेत. याबरोबरच अफसर खान नावाच्या रिक्षाचालकाला गोरेगाव परिसरातून अटक करून त्याच्याकडून 20 ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. ऑटोचालक असलेला अफसर खान हा मुंबईतील उपनगरांमध्ये कोकेनसारखे अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले होते. हा कोकेन हा रिक्षाचालक मीरारोड मधील एका अफ्रिकन नागरिकत्त्व असलेल्या तस्कराकडून घेऊन मागणीनुसार मुंबईतील वेगवेगळ्या परिसरामध्ये ऑटोरिक्षाच्या माध्यमातून पुरवठा करत होता.
हेही वाचा - भीषण आगीत मालाड मालवणी गोडाऊनचे लाखोंचे नुकसान; आग आटोक्यात
माहिममधून गांजा, एमडी जप्त -
याबरोबरच एनसीपीला मिळालेल्या गुप्त माहितीवरून, मुंबईतील माहीम परिसरामध्ये छापा मारला असता याठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पहात सलीम कुरेशी या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एमडी आणि 360 ग्राम गांजा हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या तीन आरोपींना बिग या ठिकाणावरून अटक केल्यानंतर यांचीसखोल चौकशी एनसीपीकडून केली जात आहे.