ETV Bharat / state

Cruise Drug Case : समीर वानखेडे किल्ला न्यायालयाकडे रवाना; आर्यन खानची पुन्हा वैद्यकीय तपासणी होणार - drug case aryan khan news

या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश आहे. न्यायालय याप्रकरणी आज पुन्हा सुनावणी घेणार आहे. एनसीबीकडून त्याच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे.

Sameer Wankhede
समीर वानखेडे
author img

By

Published : Oct 4, 2021, 11:43 AM IST

Updated : Oct 4, 2021, 4:05 PM IST

मुंबई - एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे किल्ला न्यायालयाकडे रवाना झाले आहेत. मुंबई ते गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर एनसीबीने केलेल्या छापेमारीत आठ जणांना अटक केली होती. यापैकी ३ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे किल्ला न्यायालयाकडे रवाना झाल्याची दृश्ये

या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश आहे. न्यायालय याप्रकरणी आज पुन्हा सुनावणी घेणार आहे. एनसीबीकडून त्याच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. तर आज आर्यन खान संदर्भात काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

ड्रग्सप्रकरणी अटकेत असलेल्या मुलगा आर्यन खान याच्यासहित दोघांना पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले आहे. नंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. एनसीबीची टीम या सर्वांना घेऊन जेजे रुग्णालयाकडे रवाना झाली.

काय आहे प्रकरण ?

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. दरम्यान, एनसीबीने पार्टीच्या आयोजकांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवासी बनून शिपमध्ये प्रवास केला आणि ही कारवाई केली.

हेही वाचा - ड्रग्ज प्रकरण : शाहरूखचा मुलगा आर्यनला अटक, सलमान रात्रीच 'मन्नत' बंगल्यावर दाखल

रिया चक्रवर्तीची केस लढवणारे अॅड. माने-शिंदे लढवणार केस -

शाहरुख खानचा मुलाची केस अॅड. सतीश माने-शिंदे हे लढणार आहेत. अॅड. माने हे किल्ला कोर्टमध्ये पोहोचले आहेत. रिया चक्रवर्तीच्या प्रकरणाची केसही अॅड. माने-शिंदे यांनीच लढवली होती. मुंबई ते गोवा क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यासहित त्याचा मित्र अरबाज आणि अन्य सहा जणांना एनसीबीने अटक केली आहे.

Last Updated : Oct 4, 2021, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.