मुंबई - मुंबईत एनसीबीने एक मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने या कारवाईत एका मानोसोपचार तज्ज्ञाला अंमली पदार्भ तस्करीच्या आरोपाखाली अटक केली आहे. मुळात हा आरोपी मानोसोपचार तज्ज्ञ होता. त्याने आपल्या घरात बेकरीचा धंदा सुरु केला होता. बेकरीच्या माध्यमातून हा आरोपी नशेचे केक बनवून विकत होता. या आरोपीचे नाव रहिम चारनिया असे आहे. माझगाव परिसरात त्याने आपला गोरख धंदा सुरु केला होता. याच्या या काळ्या कामाची खूणखूण एनसीबीला लागली. एनसीबीने जाळे रचुन या मानसोपच्चार तज्ज्ञ असलेल्या ड्रग्ज तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत.
10 किलो वजनाचे हश ब्राऊनी केक जप्त -
अटक केलेल्या आरोपीकडून एनसीबीने 10 किलो वजनाचे केक जप्त केले आहेत. तसेच 320 ग्राम आफू, 50 ग्राम हाशिषसह तब्बल 1 लाख 72 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मुळात या आरोपीने या नशायुक्त केकला हश ब्राऊनी असे नाव दिले होते. याच नावाने तो केक विकत होता. घरीच केक बनवून विकत असल्यामुळे त्याच्यावर फार कुणाचा संशय देखील येत नव्हता. एनसीबीला मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी काही ड्रग्ज पेडलरकडून हे ड्रग्ज विकत घेत असून त्यापासून केक तयार करत होता.