मुंबई: नवाजुद्दीन सिद्दीकी भावाने समसुद्दीन याने नवाजुद्दीन सोबत आर्थिक गैरववार केला. नवाजुद्दीनच्या अधिकारात हस्तक्षेप केला. यामुळे त्यांच्यात वाद झाला परिणामी 100 कोटी रुपयांचा खटला नवाजुद्दीन याने आपल्या भावावर दाखल केला. हा खटला दाखल केल्यानंतर शमशुद्दीनला त्याबाबत न्यायालयात हजर राहणे आवश्यक झाले. न्यायालयामध्ये त्यांनी समोर बाजू मांडली की याबाबत समझोतासाठी तयार आहे. त्यामुळे मागच्या महिन्यातच याबाबत समझोत्यासाठी काही अटी आणि शर्ती न्यायालयाने निश्चित केल्या होत्या. या शर्ती आधारे समजून त्याला दोन्ही भाऊ तयार होते. मात्र शमशुद्दीनचा हट्टीपणा या समाजाचा आड येत असल्याचे समजते.
ऑनलाईन बैठक: न्यायालयाच्या निर्देशानुसार अटी आणि शर्तीनुसार समजोत्याची संदर्भातली दुसरी बैठक न्यायमूर्ती छागला यांच्या चेंबरमध्ये झाली. परंतु भाऊ शमशुद्दीन यांच्या काही मागण्या अवास्तव असल्यामुळे त्या पूर्ण करणे नवाजुद्दीन याला शक्य नसल्याचे समजते. नवाजुद्दीन सध्या विदेशात आहे आणि भाऊ भारतामध्ये आहे, त्यामुळे त्यांची ही बैठक ऑनलाईन पद्धतीने केली गेली. परंतु या बैठकीमध्ये देखील समजोत्याच्या दिशेने नवाजुद्दीन आणि शमशुद्दीन यांचे पावले पडले नसल्याचे समजते. तसेच न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार समजवत्या संदर्भातल्या कोणत्याही बाबी प्रसार माध्यमांना सांगायच्या नाहीत आणि प्रसारित करायचे नाहीत, असे देखील ठरले आहे. त्यामुळे याबाबत न्यायालयामध्ये न्यायमूर्ती छागला यांच्या चेंबरमध्ये बैठकीवेळी कोणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता. पुढील बैठक जूनमध्ये न्यायालयाने निश्चित केली आहे.
भाऊ स्वार्थी असल्याचा केला आरोप: याआधी पासून प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्याची विभक्त पत्नी आलिया सिद्दीकी हिने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते आणि ती सध्या त्याच्यासोबत कायदेशीर लढाईही लढत आहे. यात भर म्हणून की काय आता नवाजचा भाऊ शम्स सिद्दीकीनेही भाऊ स्वार्थी असल्याचा धडधडीत आरोप केला आहे. भावाने नवाजुद्दीच्या व्यक्तीमत्वाचे काही पैलू उघड केले आहेत. त्याच्या या आरोपांचा विचार करता काही दिवसापूर्वी जे कंगना रनौतने गेल्या महिन्यात तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नवाजचा बचाव करताना जे म्हटले होते त्याच्या अगदी विरुद्ध आहे.
हेही वाचा: Afwaah trailer अफवाह चित्रपटाचा ट्रेलर रिलीज विलक्षण थ्रिलर चित्रपट