ETV Bharat / state

चूल पेटण्याची गोष्ट होईल वाटलं होत... मात्र, नवाब मलिक यांची पंतप्रधान मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल.

Nawab Malik
नवाब मलिक
author img

By

Published : Apr 3, 2020, 10:57 AM IST

Updated : Apr 3, 2020, 12:11 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिलला रविवारी रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणामुळे देशातील नागरिकांची निराशा झाली आहे. पंतप्रधान चूल पेटवण्याबद्दल बोलतील वाटलं होत. मात्र, त्यांनी दिवे पेटवण्याचे आवाहन केले आहे, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

  • 9 बजे सुबह प्रधान मंत्री मोदी जीके भाषण से देश वासीयों के हात घोर निराशा ही लगी,
    सोचा था चूल्हा जलाने की बात हो गी साहब दिया जलाने का उपदेश दे गए।

    — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तसेच गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत देशाला इतकेही मुर्खात काढू नका, असा टोला लगावला आहे.

  • भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत.कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते.
    तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायच ठरवल
    म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा.
    देशाला इतकेही मुर्खात काढू नका. pic.twitter.com/ZDOgvQDzPK

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
डॉ.जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र, हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, भारतामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 69 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तर 53 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 156 जण पूर्णत: बरे झाले आहेत. सर्वात जास्त रुग्ण केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

Last Updated : Apr 3, 2020, 12:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.