मुंबई - राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या भाजप आमदारावर गुन्हा दाखल करा, अन्यथा गुजरातभर आंदोलन करु असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला. लोकसभेचे निकाल लागल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते बेफान झाले आहेत. ते ठिकठिकाणी लोकांना मारत असल्याचे मलिक म्हणाले.
गुजरातमध्ये स्थानिक प्रश्न घेऊन नरोडा आमदाराच्या कार्यालयामध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या नितु तेजवानी यांना भाजप आमदार बलराम थवानी यांनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेची आम्ही निंदा करतो. तत्काळ या आमदारावर गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे अशी मागणी मलिक यांनी केली. भाजपचे आमदार बोलतात मी सॉरी बोलतो मात्र, हा सहन करण्यासारखा विषय नाही. त्यांना अटक झाली पाहीजे, नाहीतर आम्ही गुजरातभर आंदोलन करू असा इशारा मलिक यांनी दिला.