ETV Bharat / state

Investigation of Navneet Rana : नवनीत राणांची एमआरआय स्कॅन सह संपूर्ण तपासणी - undergoes an MRI scan and a full body checkup

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana ) यांनी छाती, मान आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना तसेच स्पॉन्डिलायटिसची तक्रार केल्यानंतर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital ) एमआरआय स्कॅन आणि संपूर्ण तपासणी (undergoes an MRI scan and a full body checkup) करण्यात आली.

Navneet Rana
नवनीत राणां
author img

By

Published : May 7, 2022, 12:16 PM IST

Updated : May 7, 2022, 1:23 PM IST

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी छाती, मान आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना तसेच स्पॉन्डिलायटिसची तक्रार केल्यानंतर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये एमआरआय स्कॅन आणि संपूर्ण तपासणी करण्यात आली.

नवनीत राणा भायखळा कारागृहात बंद होत्या 5 मे रोजी त्यांची 13 व्या दिवशी सुटका झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना संध्याकाळी पाच ऐवजी दुपारीच सोडण्यात आले होते. कारागृहाकतुन बाहेर आल्या नंतर नवनित राणा घरी न जाता थेट लीलावती हाॅस्पिटलला भरती झाल्या. भाजप नेते किरीट सोमय्या तसेच काही भाजप नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती या संदर्भातील व्हिडीओ त्यांनी स्वत: शेअर केले होते.

रवी राणा यांचीही नंतर तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्यांनी थेट लीलावती रुग्णालय गाठले. यावेळी रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना कंबरेचा त्रास सुरु आहे. या भेटीच्या वेळी रवी राणा यांनी नवनीत राणाचे सांत्वन केले. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे तुरुंगात असताना, ते रहात असलेल्या घराला पालिकेने नोटीस बजावली आहे. यामुळे राणा दाम्पत्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पालिकेचे पथक दोन वेळा त्यांच्या घरी गेले होते, पण घर बंद असल्याने पथकाला परत फिरावे लागले आहे.

  • Maharashtra | Amravati MP Navneet Rana undergoes an MRI scan and a full body checkup at Lilavati Hospital in Mumbai after she complained of pain in the chest, neck, and different parts of the body as well as spondylitis.

    (Pics shared by the MP's office) pic.twitter.com/4xmzQANpXe

    — ANI (@ANI) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : May 7, 2022, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.